Header Ads Widget


डायल 112 आपातकालीन प्रतिसाद प्रणाली ( MERS ) मध्ये साक्री पोलीस स्टेशन धुळे जिल्ह्यात प्रथम.

 


साक्री प्रतिनिधी/ अकिल शहा:
महाराष्ट्र एमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम (MERS) डायल 112 या प्रकल्पांची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत संकटात सापडलेल्या नागरिकांना त्वरीत मदत करण्याची जबाबदारी या प्रणालीतील पोलिसांची आहे. नेमून दिलेल्या वेळेच्या आत मदत पोहचविणे हे त्यांचे कर्तव्य असून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कार्यालयाने याआधीच दिल्या आहेत. यांचे तंतोतंत पालन करत कार्यवाही करून पिडीत कॉलर व्यक्तीस तात्काळ व मुदतीत पोलीस मदत पोहोचवल्याबद्दल साक्री पोलीस स्टेशन धुळे जिल्ह्यात प्रथम आले आहे. साक्री पोलीस स्टेशन साठी ही अतिशय अभिमानास्पद बाब असल्याने डायल 112 चे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल/रोशन चित्ते, पोलीस कॉन्स्टेबल/ मंगेश खैरनार, पोलीस कॉन्स्टेबल /निखिल काकडे व व पोलीस कॉन्स्टेबल/धनंजय चौधरी यांचा साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हर्षवर्धन गवळी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Post a Comment

0 Comments

|