Header Ads Widget


विक्की मोरे व मित्र परिवार कडून नुकताच दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित...

 

       


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:विक्की मोरे व मित्र परिवार कडून नुकताच दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने 2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावीत चांगले यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विक्की मोरे व मित्र परिवारच्या वतीने शहादा येथील हॉटेल शेरे पंजाब येथे सन्मान चिन्ह व प्रशास्तिपत्रक देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनश्री हैदर नुरानी, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) युनूस पठाण, गटविकास अधिकार राघवेंद्र घोरपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी आत्माराम प्रधान साहेब , दुय्यम निबंधक अधिकारी एस. आर. पवार , तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र वडवी साहेब गटशिक्षणधिकारी योगेश सावळे साहेब, नायब तहसीलदार विजय साळवे,ॲड जसराज संचेती,ॲड. राजेश कुलकर्णी, ॲड. जगदीश कुवर ,आंबालाल पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचां प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी हैदर नुरानी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मानवी जीवनात शिक्षणाला खूप महत्व असून ते‎ मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी ताकदीने उभे राहून‎ जिद्दीने अभ्यास करावा, उद्याचा दिवस सोन्याचा‎ करायचा असेल तर आजच कष्ट करा, असे‎ आवाहन करीत विक्की मोरे व मित्र परिवार ने आयोजित केलेल्या_विद्यार्थ्यांना उत्साह वाढवण्यासाठी उत्कृष्ट नियोजनबद्ध कार्यक्रमाबद्दल कौतुक केले. तसेच उपस्थित मान्यवरांसह गुणवंत विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले यावेळी प्राप्त केलेल्या दहावी व बारावी गुणवंतांना सन्मानचिन्ह ,मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विक्की मोरे व मित्रपरिवार यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धडगाव जिल्हा परिषद केद्रप्रमुख उमेश श्याम कोळपकर यांनी तर सूत्रसंचलन जिल्हा परिषद शहादा केद्रप्रमुख महेंद्र बैसाने यांनी केले.

Post a Comment

0 Comments

|