Header Ads Widget


मेंढपाळ बांधवांचे प्रश्न त्वरित सोडवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार:-धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनास निवेदन सादर....

 


साक्री प्रतिनिधी/अकिल शहा:
साक्री तालुक्यातील विशेषतः महिर, टेंभे प्र. भडगांव, वर्धाने, नागपूर लखमापूर, घाणेगांव पैकी रामनगर, या गावातील पारंपारीक गुरचरण गायरान वनजमीनीवर होणारे अतिक्रमण त्वरीत थांबवा व या गावातील मेंढपाळ ठेलारी, धनगर लोकांविरुध्द दाखल केलेल्या खोटया केसेस त्वरीत मागे घ्या व वर्धाने, ता. साक्री, जि. धुळे बिटातील कक्ष क्रमांक ४१३ मधील २०५ हेक्टर जमीन असुन फक्त ०७ लाभार्थ्यांना दावा पात्र असुन व उर्वरीत ५४ दावे अपात्र झाले 17-202, असुन दावेदारांनी जमीन बळकाविली असून तरी मेंढ्या चारण्यासाठी वनजमीन मुक्त करा अशा विविध मागण्यांचे निवेदन धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने साक्री चे नायब तहसिलदार राजेंद्र सोनवणे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की,साक्री तालुक्यातील महिर, टेंभे प्र. भडगांव, वर्धाने, नागपूर लखमापूर, घाणेगांव पैकी रामनगर, या गावाच्या शिवारातील वनविभागाच्या शासकीय जमीनीवर म्हणजेच गुरचरण, गायरान व पाणवठा तसेच शिवाराकडे जाणाऱ्या पारंपारीक वहिवाटी रस्त्यांवर एका रात्रीत महिर, टेंभे प्र. भडगांव, वर्धाने या गावातील इतर लोकांनी वर्धाने, ता. साक्री, जि. धुळे बिटातील कक्ष क्रमांक ४१३ मधील २०५ हेक्टर जमीन ०७ लाभार्थ्यांना दावा पात्र असुन व उर्वरीत जमीन अपात्र दावेदारांनी १०० % जमीन बळकाविलेली आहे. तसेच ज्या लोकांकडे त्यांच्या स्वतंत्र मालकीच्या व वडिलोपार्जीत शेतजमीनी आहेत असे लोक देखील राखीव गुरचरण, गायराण, पाणसाढा वहिवाटी रस्ते इत्यांदीवर अतिक्रमण करीत आहे. त्यामुळे आमच्या मेंढया चारण्यास जागा शिल्लक राहणार नाही व मेंढयाची उपासमार होईल व मेंढया मरण पावतील त्यामुळे आमचा मेंढपाळ व्यवसाय धोक्यात येणार आहे. तसेच नागपूर लखमापूर या क्षेत्रात मेंढ्या चारण्याच्या जांगेवर प्लॉनटेन झाल्यामुळे मेंढपाळांना मेंढया चारण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण झालेल्या आहेत. तरी वनविभागाने मेंढया चारण्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी. सदर घटनेबाबत आम्ही अतिक्रमण करणाऱ्या लोकांचा विरोध केला असता ते आमच्याविरुध्द खोटया नाटया अॅट्रासिटीच्या केसेस दाखल करण्याच्या धमक्या देत असतात. तसेच खोटी वनसमिती तयार करुन खोटे कागदपत्र ग्रामपंचायतीचे ठराव व सही शिक्के तयार करुन तसेच खोटे प्रस्ताव सादर केल्यामुळे शासनाने याबाबत चौकशी करुन संबंधितांवर शासनाची फसवणुक केल्याबाबत गुन्हे दाखल करावेत. तरी वेळेत शासनाने व वनविभागाने योग्य ती दखल घेवुन चौकशी करुन कारवाई करावी. तसेच काही राजकीय व सामाजिक संघटना देखील सदर अतिक्रमण करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देत असुन स्थानिक भुमिपुत्रांना त्यांच्या न्यायहक्कापासून वंचित करीत आहेत.

 मेंढपाळ ठेलारी समाजात व स्थानिक भुमिपुत्रांमध्ये असंतोष व असुरक्षितता निर्माण झाली असुन, येत्या ४-५ दिवसांत. मा. जिल्हाधिकारी व मा. वनविभागाचे अधिकारी व तसेच मेंढपाळ करणारे ठेलारी व धनगर समाजातील प्रतिष्ठीत लोकांना बोलावुन आपसांत मिटींग करुन सदर प्रश्न मार्गी काढण्यात यावा व मेंढपाळ ठेलारी-धनगर समाजाला न्याय देण्याचे करावे तसेच ठेलारी व धनगर समाजाला मेंढ्या चारण्यासाठी मोफत चराई पास देण्यात यावा व शासनाकडून मेंढपाळ बांधवांचे व मेंढयाचा विमा काढण्यात यावा तसेच सदरचे प्रश्न येत्या ४-५ दिवसांत सोडविण्यात आल्या नाहीत तर धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने महिर फाट्यावर सर्व मेंढयासोबत घेवुन रास्ता रोको करण्यात येईल मग मात्र होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील या निवेदनावर रमेशआप्पा सरक,रावण शिवाजी सरक, बापू रामा सरक रामडू भिला सरक, पोपट पंडित सरक, सुभाष घोटू सरक, विठ्ठल उत्तम गोयकर, गोटू रामा सरक, सुरेश वाणू गोयकर, रामदास जगनाथ गोयकर भटू लहानु सरक, आबा उत्तम सरगर,भाऊसाहेब दादाजी सरक, सुरेश बापू सरक, बाजिराव काशिनाथ सरक, गोरख बळीराम गोयकर, पिंटू राजू सरक आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments

|