Header Ads Widget


विशाळगडावर हिंसाचारामध्ये नुकसान झालेल्या निष्पाप लोकांना तात्काळ आर्थिक मदत करा: श्री.समद कुरेशी (अल्पसंख्याक विकास मंडळ जिल्हाध्यक्ष बुलढाणा)

 


बुलढाणा /प्रतिनिधी :
घटनेचा जाहीर निषेध करत; आज बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन सादर करत थेट मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व गृह राज्यमंत्री यांच्याकडून आर्थिक मदत व  या घटनेची चौकशी होऊन आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, सविस्तर वृत्त असे की विशाळगडावर हिंसाचार करणा‌ऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करून, हिंसाचार दगडफेकजाळपोळ मध्ये नुकसान झालेल्या निष्पाप लोकांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावे, अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला हिंसक वळण देऊन. दंगे खोरांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद जवळ जय श्रीरामाच्या घोषणा देत दगडफेक केली. खरंतर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही घटना शाहू फुले आंबेडकर विचारांना काळीमा फासणारी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये विशाळगड जिंकून घेतला होता. म्हणजेच जवळपास ४३ वर्ष मराठ्यांची विशाळगडावर सत्ता होती, मात्र त्या काळात छत्रपती शिवरायांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद या वास्तूंच्या मूळ स्वरुपाला धक्का लावला नव्हता. म्हणजेच या वास्तू १६५९ च्या आधीपासून अस्तित्वात होत्या हा इतिहास शिवप्रेमींनी विसरू नये. विशाल गडावरील हिंसाचार घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण झाला आहे. विशालगडाच्या पायथ्याशी असलेले गजापूर गावात प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहने जळून खाक झाली, विशेष म्हणजे अतिक्रमणाशी या गावाचा कोणताच संबंध नव्हता, विशेष करून तेथील अल्पसंख्यांक समाजावर टार्गेट करून हिंसा घडविण्यात आली. विशाळगड अतिक्रमण प्रकरण हा कोर्टात न्यायप्रविष्ट आहे, अतिक्रमणविरोधी मोहिमेत कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नाही कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही, म्हणून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून जाळपोळ मध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी व संबंधित दंगेखोरांवर कायदेशीर कारवाई करून दंगेखोरांना अटक करण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.अशी मागणी अल्पसंख्यांक विकास मंडळ बुलढाणा जिल्हाध्यक्ष समद कुरेशी, ईमरान मेबर, इमाम शाह बुलडाणा जिल्हा सचिव, जिल्हाउपाध्यक्ष इमरान शेख, मलकापुर शहर अध्यक्ष एस एम साजीद, हुसेन भाई मलकापुर शहर उपाध्यक्ष, रहेमान खान, शे करीम अफ़रोज़ खान ज़फ़र खान ,मुजमील खान RMM शहर उपाध्यक्ष ,अजर खान RMM व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली आहे.







Post a Comment

0 Comments

|