Header Ads Widget


संकल्प ग्रुप शहादा तर्फे दप्तर वाटप संपन्न...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी /प्रा. गणेश सोनवणे:
संकल्प ग्रुप शहादा तालुक्यात गेल्या ८ वर्षा पासून सक्रिय असून गरीब आणि गरजू वर्गा साठी कार्य करीत असतो, संकल्प ग्रुपच्या सदस्यांना जेव्हा निरोप मिळाला की नगरपालिका शाळा क्रमांक 1 मध्ये गरजू विद्यार्थी आहेत लागलीच , दुसऱ्या दिवशी संकल्प ग्रुप ची टीम शाळा क्रमांक एक येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर, आणि खाऊ विद्यार्थ्यांना पोहोचवली,सदर उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ श्री अजयजी शर्मा तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री चंदूकाका शहा हे होते, मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच संकल्प ग्रुपचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, सदर उपक्रमासाठी, शाळा क्रमांक एकचा स्टाफ व संकल्प ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून ग्रुपचे मेंबरला आनंद झाला.अध्यक्ष पिनाकिन पटेल, उपाध्यक्ष सुनील पाटील सर तसेच शिवपाल जांगिड, संदीप बेलदार, प्रमोद मोरे, बिपिन चव्हाण, प्रशांत कदम, जितेंद्र ललवाणी, रोहित अहिरे, पंकज पवार, राकेश कोचर, राकेश जैन उपस्थित होते,

Post a Comment

0 Comments

|