Header Ads Widget


स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन ...

 


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:शहादा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे दिनांक २७ जून रोजी विविध मागण्यांचे निवेदन शहादा तहसीलदार यांना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटपाची कमिशन वाढवून मिळावे वापरण्यात येणाऱ्या यंत्राबाबत नेट बाबतीत तांत्रिक अडचण दूर करावी स्वस्त धान्याच्या माल मोजून मिळावा मालाचे बारदान मिळावे तसेच गहू तांदूळ चांगल्या दर्जाच्या मिळावा या सह अन्य मागण्या केल्या आहेत.निवेदनावर राजेंद्र गुरव ज्ञानेश्वर चौधरी माधवराव पाटील मनोहर जैन अमिता अग्रवाल प्रकाश सामुद्रे सह अन्य स्वस्त धान्य दुकानदाराच्या सह्या आहेत.निवासी नायब तहसीलदार साळवे यांनी निवेदन स्वीकारले.स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अरविंद कुवर यांनी निवेदनावरील मागण्या तात्काळ शासनाकडे पाठवण्यात याव्यात अशी मागणी केली.

Post a Comment

0 Comments

|