Header Ads Widget


कै. डॉ. विश्राम काका पाटील शैक्षणिक संकुलातील विज्ञान, कला, वाणिज्य शाखेचा ९०.१७ टक्के निकाल... प्राचार्य. आय. डी. पटेल

  



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी प्रा गणेश सोनवणे:
 महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता बारावी परिक्षा २०२४ चा आँनलाइन निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. येथील कै सै. जि. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेच्या ९८ टक्के, कला शाखेचा ६७ टक्के, वाणिज्य शाखेच्या ८७ टक्के तर एमसीवीसी विभागाच्या ८५ टक्के निकाल लागला आहे. विज्ञान शाखेत सर्वज्ञ अंबालाल पाटील ९१:१७ टक्के तर पुष्कर हिरालाल पाटील ९०:६७, वाणिज्य शाखेत तिथी किशोर जैन हिस ९०:६७ टक्के गुण मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य आय.डी.पटेल यांनी दिली आहे. 

     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक परिक्षा फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेण्यात आले आहेत. परिक्षेचा आँनलाइन निकाल आज दुपारी एक वाजता राज्य महामंडळाने जाहीर केले आहेत. 

शहादा तालुका को.ऑफ व को. आँप एज्युकेशनल सोसायटी संचलित कै. सै. जि. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत ८६९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते. त्यापैकी ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ९८:२७ टक्के लागला आहे. कला शाखेत २५६ विद्यार्थी नोंद झाली होती पैकी १७० विद्यार्थी परीक्षेला पास झाले आहे ६६:४० टक्के निकाल लागला आहे.वाणिज्य शाखेत ६९ विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी ६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ८६:९५ टक्के लागला आहे. तसेच एमसीवीसी विभागातून ३९ विद्यार्थी पैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकाल ८४:६१ टक्के लागला आहे. 

........... विज्ञान शाखा.......... 

विज्ञान शाखेत महाविद्यालयातील सर्वज्ञ अंबालाल चौधरी यास ९१:६७ टक्के, पुष्कर हिरालाल पाटील ९०:६७ टक्के, चिन्मय मोहन कुलकर्णी व रिद्धी संजय पाटील या दोघांना ९०:३३ टक्के गुण मिळाले आहेत. प्रथमकुमार वीरेंद्र राजपूत ९०:१७ टक्के, वैभव विनोद आहुजा या ९०:०३ टक्के गुण मिळाले आहेत. प्रसेनजीत मानवकुमार उपगडे व मनस्वी अनिल पाटील या दोघांना ९० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. वाणिज्य शाखेत तिथी किशोर जैन हिने 90.67% गुण उत्तीर्ण झालेली आहे. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान कला व वाणिज्य या शाखेतील १ हजार १९४ विद्यार्थ्यांपैकी एक हजार ८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ९०:७८ टक्के निकाल लागलेला आहे यशस्वी विद्यार्थ्यांच्या संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील व व्हाचेअरमन हिरालाल पाटील, संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील संचालक मंडळ संस्थेचे प्राचार्य आय.डी .पटेल विज्ञान शाखेचे शाखाप्रमुख प्रा.एस आर पाटील, प्रा.एस एम सोनार,प्रा. सी एस पाटील, मुख्यालय लिपिक टिला पाटील, याच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी विद्यार्थ्यांच्या कौतुक केलेले आहे.

Post a Comment

0 Comments

|