Header Ads Widget


वातावरणातील तापमानाच्या परिणाम केवळ मनुष्य जीवनावर होत नसून प्राणी व पक्षांवर देखील होऊ लागला



नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:शहादा शहरातील तापमान जवळपास 44°c असल्याने बालकांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत त्याची झळ पोहचत आहे. वातावरणातील तापमानाच्या परिणाम केवळ मनुष्य जीवनावर होत नसून प्राणी व पक्षांवर देखील होऊ लागला आहे. याचीच परिनीती म्हणून पक्षी देखील या तापमानामुळे आपला जीव गमावत असल्याचे चित्र पहावयास मिळते  

मानवाने निसर्गाशी केलेला खेळ हा मानवी जीवनासोबतच प्राणी व पक्षांना देखील त्रासदायक ठरत आहे. मनुष्याने केलेली प्रगती यामुळे जंगल शेत यावर केलेले मानवी प्राण्यांचे अतिक्रमण यामुळे जंगली प्राणी पक्षी यांना वास्तव्यास जागा शिल्लक राहिलेली नाही. पाण्याच्या शोधात जंगलातील, रानातील प्राणी हे मानवी वस्तीकडे पलायन करताना दिसतात. 

बऱ्याचदा शहरांमध्ये गल्लीबोळ्यात बिबट्या निघाल्याचे किंवा दिसल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते या सर्व गोष्टींसाठी मानवाने केलेली प्रगती जबाबदार धरणे योग्य होईल. मानवाने केलेले झाडांचे नुकसान यामुळे वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण वाढले आहे सोबतच पाण्याच्या निचरा देखील जमिनीत होत नसल्याने पाण्याची जमिनीतली पातळी देखील खोल होत आहे. पुढे गेल्यानंतर पाण्यासाठी मनुष्य प्राण्यांना जागोजागी फिरावे लागेल सद्य परिस्थिती देखील तशीच झालेली आहे.

वातावरणातील तापमानाचां परिणाम कमी प्रमाणात व्हावा म्हणून मनुष्य प्राणी हा बुद्धिजीवी प्राणी असल्यामुळे वातानुकलित वातावरणामध्ये त्याचे समायोजन करून घेतो परंतु प्राण्यांच्या व पक्ष्यांच्याविचार केला तर ते देखील वातावरणातील उष्णता कमी जेथे असेल त्या ठिकाणी वास्तव्य करण्यासाठी धावताना दिसतात. इमारती घर ही सिमेंट ची बनलेली असल्याने वातावरणातील तापमान याच्या परिणाम घर व इमारती यांचे भिंती स्लॅब हे तापलेले असतात व परिसरात झाडं नसल्याने पक्षी न्यायला जाणे त्यात तापलेल्या भिंतीवर बसतात व त्याची दाहकता मोठी असल्याने पक्षांना आपल्या जीव गमवावा लागत आहे. 

शहरातील शारदा नगर या ठिकाणी सकाळी एशियन कोकीळा नावाच्या पक्षी मृत अवस्थेत आढळून आला. हा परिणाम देखील वातावरणाच्या असल्याचे बोलले जात आहे. त्या पक्ष्यास परिसरातील प्रा गणेश व विद्या सोनवणे दांपत्याने विधिवत जमिनीत पुरले . तसेच शहरातील स्वस्तिक पेट्रोल पंप चा मागील वसाहतीत ईश्वर पाटील यांना देखील एक अनोळखी पक्षी मृत अवस्थेत आढळून आला. या सर्व बाबी टाळण्यासाठी नागरिकांनी झाडे लावणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे.

एशियन कोकिळा सह कोकिळा कावळे, चिमण्या इत्यादी पक्षी माझ्या परिसरातील झाडावर नेहमीच येत असतात रोज सकाळी सहा वाजता त्यांच्या किलबिलाट सुरू होतो त्यांच्या किलबिलाटाने मनाला आनंद होत असतो. त्यांना मी गाठी शेव खाऊ घालत असते. सकाळी उठल्या उठल्या कावळा मोठ्याने आवाज देतो. पक्षांना प्रेम दिले तर पक्षी आपसूकच आपल्याकडे आकर्षित होत असतात व आत्ताच्या तापमानाने त्यांना होणारा त्रास बघवत नाही यासाठी सर्वांनी झाडे लावावी व पक्षांसाठी अन्न व पाणी आपल्या छतावर किंवा घराच्या आजूबाजूला ठेवावे जेणेकरून पक्षांना त्रास होणार नाही.

    सौ. विद्या गणेश सोनवणे

         शारदा नगर शहादा

Post a Comment

0 Comments

|