Header Ads Widget


गोमाई नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम दिनांक २६ मे पासून युद्ध पातळीवर सुरू


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे:डामरखेडा तालुका शहादा गावा जवळील प्रकाशा रस्त्यावरील गोमाई नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम दिनांक २६ मे पासून युद्ध पातळीवर सुरू करण्यात आल्याने वाहनधारक व नागरिकांनी सुटकेच्या निश्वास सोडला आहे.

गेल्या दोन वर्षापासून प्रकाशा व डामरखेडा गावात दरम्यान गोमाई नदीवरील पूलची अवस्था खराब झालेली होती.पूर्ण पुलावर मोठमोठाली खड्डे पडलेले आहेत. शिवाय संरक्षण कठड्याच्या भिंतीची देखील दुर्दशा झालेली होती. अनेक ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. अपघाताच्या धोका निर्माण झालेला होता. पुला खाली प्रकाशा बेरजेचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात असल्याने पाण्याच्या फुगवटा आहे त्यामुळे अनर्थ घडण्याची शक्यता होती. फुल पूर्णतः खराब झालेला होता. पुलाची क्षमता संपल्याने, गेल्या तीन महिन्यापासून पूलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला होता.अवजड वाहनांसाठी वाहतूक वळविण्यात आलेली होती. वाहनधारकांची होणारी गैरसोय लोकप्रतिनिधींच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारी बघता पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आलेले आहे.पुलावर नवीन हॉट मिक्स पद्धतीने डांबरीकरण केले जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूस असलेला भराव दुरुस्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आलेले आहेत. मात्र केवळ पुलावरचे डांबरीकरण करून न थांबता पुलाच्या दोन्ही बाजूस असलेले संरक्षक कठडे देखील करण्यात यावे अन्यथा पुलाच्या दुरुस्तीचे काम करून उपयोग होणार नाही.याच जुन्या पुलाला लागून नवीन समांतर पुलाचे बांधकाम सुरू आहे. विसरवाडी ते खेतिया हा राष्ट्रीय मार्ग झाल्याने प्रकाशा येथील तापी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. या गोमाई वरील नवीन पुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याने नाईलाजाने वाहतूक जुन्या पुलावरून सुरू आहे. एकंदरीत गोमाई नदीच्या पुलावरील दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments

|