Header Ads Widget


कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलातील सभागृहात कवी व लेखक उपेंद्रराज देवढे लिखित सहस्त्ररश्मी कविता संग्रहांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न....

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/ प्रा. गणेश सोनवणे:कवितेत कवी हा वेदना व आपल्या भावना व्यक्त करण्याच्या प्रयत्न करीत असतो.कविता या जीवनात लढायला शिकवतात.प्रत्येकाने साहित्य जपले पाहिजे.सकारात्मक विचार महत्त्वाच्या असतो ते जगायला शिकवतात.कवितेच्या माध्यमातून जगायला बळ व प्रेरणा मिळत असते असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.विश्वासराव पाटील यांनी केले.  दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता शहादा येथील कर्मसाक्षी प्रेमचंद जाधव शैक्षणिक संकुलातील सभागृहात कवी व लेखक उपेंद्रराज देवढे लिखित सहस्त्ररश्मी कविता संग्रहांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते त्यात पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्रा. डॉ.विश्वासराव पाटील बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आदिवासी कवी व ज्येष्ठ साहित्यिक वाहरू सोनवणे होते.प्रमुख अतिथी म्हणून सातपुडा शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक संजय जाधव शहादा गटशिक्षण अधिकारी डॉ. योगेश सावळे नंदुरबार येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. वनमाला पवार अहमदनगर येथील कवी व लेखक संजय बोरुडे अहमदनगर येथील कवी डॉ. संतोष कुमार राठोड ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड.गोविंद पाटील धडगाव येथील शिक्षण अधिकारी डी.डी.राजपूत अहमदनगर येथील साहित्याक्षर प्रकाशनच्या रचना मॅडम व सहस्त्र रश्मी कविता संग्रहाचे कवी उपेंद्रराज देवढे उपस्थित होते.प्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमात विशेष म्हणजे सर्व प्रमुख अतिथींचे वृक्ष लागवडीची रोपे देऊन स्वागत करण्यात आले.नंतर मान्यवरांच्या हस्ते कवितासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुढे बोलतांना प्रा. डॉ. विश्वासराव पाटील यांनी कोणत्याही कवितेला विषयाचे बंधन नसते.कविता ह्या संवेदनशील असल्या पाहिजे.कवितेत वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात.प्रत्येक मनुष्य हा कवी आहे तसेच साहित्यीक देखील आहे.प्रत्येकाने साहित्य वाचले पाहिजे असे आव्हान केले.तर ज्येष्ठ साहित्यिक व आदिवासी कवी वाहरू सोनवणे यांनी बोलतांना माणूस म्हणून जगण्यासाठी कविता केल्या पाहिजेत.राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या कविता लिहिल्या पाहिजेत.साहित्य हे मौल्यवान आहे त्याची जतन केले पाहिजे.साहित्यातून आपले भाव प्रगट केले पाहिजेत शिवाय जातीवादी नसावे.भावना व्यक्त करण्यासाठी साहित्य असावे.शिक्षण हे प्रभावी झाले पाहिजे म्हणजे देशाच्या विकास होईल.कविता या मुलांना प्रोत्साहित करतात असे सांगून शुभेच्छा दिल्या. तर अहमदनगर येथील कवी प्रा. डॉ.संजय बोरुडे यांनी बोलतांना उपेंद्रराज देवढे यांनी कविता लिहिण्याच्या चांगला प्रयत्न केला आहे.कविता संग्रह हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी आहेत.कवी हा संवेदनशील असावा.कविता व साहित्य अतिशय महत्त्वाच्या आहेत त्याची जपणूक करा असे सांगितले तर प्राध्यापक संजय जाधव यांनी कविता या सर्व संपन्न गुण असल्या पाहिजेत.सर्वांना त्याच्यापासून प्रेरणा मिळाली पाहिजे.वाचन संस्कृती जोपासली पाहिजे असे सांगून शुभेच्छा दिल्या. याव्यतिरिक्त गटशिक्षण अधिकारी डॉ. योगेश सावळे अधिव्याख्याता डॉ.वनमाला पवार डॉक्टर संतोष कुमार राठोड यांनी देखील मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अमोल शिंदे यांनी केले तर उपस्थित आमचे आभार लेखक व कवी उपेंद्रराज देवढे यांनी व्यक्त केलेत कार्यक्रमाला तालुक्यातील असंख्य शिक्षक जिल्ह्यातील कवी तसेच साहित्यिक उपस्थित होते.सहस्त्ररश्मी कविता संग्रह पुस्तकाचे लेखक व कवी उपेंद्रराज देवढे हे औरंगपूर तालुका शहादा येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments

|