Header Ads Widget


चिमुकली सानिया ने ठेवला कडकडित उन्हात रोजा (उपवास)...

 

साक्री प्रतिनिधी/अकिल शहा: चिमुकले रोजेदार यंदाच्या रमजान पर्वात चर्चेचा विषय ठरत आहे. एकीकडे हवामान खात्याने धुळे जिल्हयाला विशेषतः उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जनतेला विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले असताना सुद्धा या वर्षी मोठ्या प्रमाणावर लहान मुलांकडून रोजा केला जात आहे. अगदी ६ ते ९ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. मोठ्यांनाही कासावीस करून टाकणारे रोजे लहान मुलांकडून केले जात असल्याने सध्या त्यांच्याबद्दलच सर्वत्र चर्चा सुरू आहे.यंदा १४ ते १५ तासांचा रोजा आहे. इतक्या तासांमध्ये निर्जल रोजा करणे, अतिशय जिकरीचे आहे. त्यात दिवसा कडाक्याचे ऊन जाणवत आहे. असे असताना कुठलीही चिंता न करता निर्धास्त चिमुकले रोजा करत आहे. अगदी ६ते ९ वयोगटातील चिमुकल्याचादेखील रोजा करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. सानिया अशपाक शहा रा.शेवाळी (दा.) ता. साक्री जि. धुळे येथील या ९वर्षीय चिमुकलिने रोजा करण्यात आला. सानिया हि माजी ग्रामपंचायत सदस्य सादिक (शकील दादा) शहा यांची नात आहे. तिच्या रोजा करण्याने शहा कुटुंबीयांच्या घरी ईदच्या महिनाभर पूर्वीच ईद साजरी झाली. सर्व कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे परिसरातील मुस्लिम बांधवांसह गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

|