Header Ads Widget


कॉ.जयसिंग माळी यांना मानणारा वर्ग व पुरोगामी विविध पक्ष संघटना तर्फे शोक सभेचे आयोजन...


नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी/प्रा. गणेश सोनवणे 

मोड तालुका तळोदा येथे अखिल भारतीय किसान सभेचे उपाध्यक्ष व माकपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कॉ.जयसिंग माळी यांच्या निधनानंतर दिनांक २७ मार्च रोजी दुपारी बारा वाजता कॉ.जयसिंग माळी यांना मानणारा वर्ग व पुरोगामी विविध पक्ष संघटना तर्फे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते.  गेल्या पंधरा दिवसांपूर्वी चळवळीचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड जयसिंग माळी यांचे निधन झाले होते.त्यांच्या निधनानंतर शोक सभेचे आयोजन कॉम्रेड बी.टी.आर विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते.या शोक सभेच्या वेळी माझी आदिवासी विकास मंत्री व विद्यमान आमदार ॲड.के.सी.पाडवी नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आदिवासी एकता परिषदेचे ज्येष्ठ नेते कॉ.वहारू सोनवणे शेतमजूर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉ.सुनील गायकवाड माकपाचे जिल्हा सचिव कॉ. नथू साळवे प्रतिभा शिंदे माकपाचे राज्य सचिव कॉ.डी.एल. कराड कॉ.सुनील मालसुरे कॉ किसन गुजर सहसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.  शोक सभेच्या प्रारंभी स्वर्गीय काँ. जयसिंग माळी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले व सामूहिक श्रद्धांजली दिली.माजी मंत्री के.सी.पाडवी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक वहारू सोनवणे कॉम्रेड डी.एल.कराड सह अन्य नेत्यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून स्वर्गीय कॉम्रेड जयसिंग माळी यांच्या परिवाराचे सांतवन केले.शोक सभेचे प्रास्ताविक कॉ.नथू साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन कॉ.सुनील गायकवाड यांनी करून आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

|