Header Ads Widget


एस ए मिशन हायस्कूलला तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण झाले...

 






प्रतिनिधी /शहादा

     राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र पुणे आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांच्यातर्फे एस ए मिशन हायस्कूलच्या आवारामध्ये तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण घेण्यात येत आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील शहादा तालुका प्रशिक्षण समन्वयक माधवराव मोरे यांच्या उपस्थितीत सुरू आहे.

   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अपेक्षित बदलाच्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यभर वैविध्यपूर्ण उपक्रमाची अंमलबजावणी केली जात आहे. अध्यापनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापर करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक सोपी व्हावी या दृष्टीने शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे . प्रशिक्षणाच्या शहादा तालुक्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता अकरावी व बारावी शिक्षकांनी लाभ घेतला आहे. एकूण तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणास तज्ञ सुलभक के एन पाटील , डी आर पाटील, श्रीमती योगिता पाटील श्रीमती संगीता जयस्वाल, आय एस मोरे, जयवंत चव्हाण, शरद पाटील, प्रवीण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

      सुलभक अगदी चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण देत आहे प्रशिक्षण देताना शिक्षकांच्या सहभाग नोंदवत आहेत. शिवाय स्लाईड शो मार्फत प्रशिक्षण देवून प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थी चां सहभाग नोंदवत आहेत. शिक्षणाधिकारी यांच्या वातावरणामध्ये पार पडून विद्यार्थी सर्वांगीण विकास घडविण्यासाठी मदत होणार आहे. प्रशिक्षण हे तीन दिवसाचे असून प्रशिक्षणाचा समारोप हा सहा मार्चला होणार असल्याचे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

|