Header Ads Widget


मालपुर फाट्याजवळ ट्रकची मोटरसायकलला जोरदार धडक; मोटर सायकल चालकाचा अपघातात दुर्देवी मृत्यू...

 






साक्री प्रतिनिधी/अकिल शहा


धुळे जिल्ह्यातील साक्री शहरापासून अवघ्या ५ ते ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या साक्री - पिंपळनेर रस्त्यावरील मालपूर फाट्याजवळ मंगळवारी रोजी ट्रक व मोटर सायकल मध्ये अपघात होवून या अपघातात मोटर सायकल चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहिती नुसार, मोटर सायकल चालक तुषार दिलीप बोरसे (वय.43 रा. धाडणे ता.साक्री जि.धुळे)आपल्या बजाज प्लॅटिना वाहन नं.MH 18 BQ 6546 ने एशियन डेयरी, दिघावे येथून गावी परत जात असतांना दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटर सायकलला अशोक लेलँड माल ट्रक क्रं MH 18 BG 4979 ने ठोस दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर व शरीरावर ठिकठिकाणी दुखापत झाल्याने त्यांना साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.ट्रक चालक पसार झाला असून घटनेची खबर सुनील पगार (रा.कजवाडे ता. मालेगांव जि. नाशिक) मृत व्यक्तीचे नातेवाईक यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिली असून अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदळ करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|