Header Ads Widget


डीपीला पैसे नाही दिलेत या रागातून सहा ते सात जणांच्या जमावाचा एकावर हल्ला; निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

 




साक्री प्रतिनिधी/अकिल शहा 


शेताजवळील डीपीला पैसे दिले नाहीत म्हणून राग आलेल्या सातजणांनी शिवाजीनगर भागातील सोलर कंपनीच्या सुपरवायझरला हातात तलवार घेऊन संपवून टाका म्हणून मारहाण केली. याप्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिवाजीनगर भागात सोलर कंपनीचे सुपरवायझर दगडू तुळशिराम कोरडकर (वय ३२,रा.रायपूर ता. साक्री जि. धुळे) यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादी नुसार शेताजवळील डीपीला पैसे दिले नाहीत तसेच मागील भांडणाचा वचपा काढण्यासाठी रायपूर येथील सहा ते सात जणांचा जमाव कंपनी परिसरात पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास एका वाहनासह दाखल झाले. एकाच्या हातात तलवार होती.

कंपनीची लाईट गेल्याने पाहणी करण्याकरिता वाहन घेऊन बाहेर पडलो असता एकाने दगड मारून फेकला.दगडूला गाडीतून काढून संपवून टाका, अशी आरडाओरड करीतधमकी देण्यात आली. हे ऐकताच वाहनातून उतरून जीव वाचवित पळ काढला असता मारेकऱ्यांनी पाठलाग सुरू केला. सुदैवाने एका ठिकाणी लपल्यामुळे जीव वाचला. त्यानंतर या इसमांनी एमएच १८ बीसी ७६४९ क्रमांकाच्या बोलेरो वाहनावर दगडफेक करीत नुकसान केले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती. सुपरवायझर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि हनुमंत गायकवाड करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

|