Header Ads Widget


जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यशाळा संपन्न - किरण बिडकर

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी :  दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी 


जिल्ह्यात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई व परिसर संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे नुकतीच जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यशाळा संपन्न झाली असल्याचे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या कार्यशाळेत जिल्ह्यातील रस्ते अपघात व मृत्यू यांची सद्यस्थिती, रस्ता सुरक्षा व आवाहने  यावर चर्चा करण्यात आली. समितीच्या सदस्यांना सुरक्षीत कार्यप्रणाली व हेडन मॅट्रीक्स या संकल्पनेबाबत सविस्तर माहीती दिली. रस्ता सुरक्षा जोखमीचे घटक वेग मर्यादा, सीट बेल्ट, हेल्मेट, मद्यपान करुन वाहन चालविणे, सदोष रस्त्यांची रचना आणि तात्काळ वैद्यकिय मदत याविषयी अवगत करण्यात आले. परिसर संस्थेचे वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी संदिप गायकवाड व सुशील पाठारे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेस उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, पोलीस निरीक्षक भरत जाधव, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रिती पटले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एस.टी. बस आगार, नगर परिषद , नगरपालीका नवापूर, व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीतेसाठी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक निलेश पाटील, यांनी विशेष प्रयत्न केले.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, May 1. | 11:48:6 AM