Header Ads Widget


Aimim पक्षामध्ये औरंगाबाद शहरातील हमालवाडा परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश....

औरंगाबाद /प्रतिनिधी :- येत्या 2024 निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना जोडण्याच्या कामाला सुरुवात झाली असून औरंगाबाद शहरातील हमालवाडा परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी Aimim पक्षामध्ये प्रवेश केला खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केलेली विकास कामे आणि सर्व जातीधर्मातील लोकांच्या मदतीला धावत असतात तसेच इतर समाजातील लोकांना सोबत घेऊन चालत असल्याने एकीकडे एमआयएम पक्षाकडे लोकांचा विश्वास वाढत चाललेला आहे या अनुषंगाने एमआयएम पक्षात युवा पिढीचे प्रवेश घेण्यास सुरुवात झाली आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी भैया पटेल,युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हमालवाडा या परिसरातील शेकडो दलित युवा बांधवांनी एमआयएम पक्षात प्रवेश केला युवकांना संघटित करून पक्ष प्रवेश करण्यासाठी सोशल मीडिया अध्यक्ष अनिस पटेल,आणि सातारा वार्ड अध्यक्ष साबेर पटेल यांनी परिश्रम घेतले अबरार कॉलनी येथील वार्ड अध्यक्ष साबेर पटेल यांच्या कार्यालयात प्रवेश सोहळा कार्यक्रम पार पडला या प्रवेश सोहळा कार्यक्रमाच्या वेळी गणेश तूसांबर यांना युवा जिल्हा उपाध्यक्ष तर कुणाल बावत आणि अजय मगरे यांना युवा जिल्हा सोशल मीडिया समन्वयक पदी नियुक्ती पत्र देण्यात आले.

या प्रवेश कार्यक्रमात युवा जिल्हा अध्यक्ष मुंशी भैया पटेल यांच्या आदेशानुसार युवा जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले तसेच वार्ड अध्यक्ष साबेर पटेल,अनिस पटेल, युवा जिल्हा महासचिव शेख कलीम, शकील पटेल, आजहर पटेल, अजीम पटेल, फेरोज खान, मोहम्मद शफीक, यांची यावेळी उपस्थिती होती.

याचबरोबर जावेद खान, साबेर पटेल, अजीम पटेल, यांनी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले,कार्यक्रमाच्या शेवटी साबेर पटेल यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, April 14. | 1:57:3 AM