धुळे/प्रतिनिधी
दोंडाईचा येथील येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नाजीम शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या धुळे ( ग्रामीण ) जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राकॉपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब व प्रदेश अध्यक्ष मा. खा. सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले,महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री अनिल दादा पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी विधी व न्याय मंत्री डॉ. नानासाहेब हेमंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश सोनवणे साहेब,प्रदेश सरचिटणीस ईरशाद भाई जहागिरदार यांची शिफारसी नुसार नियुक्ती करण्यात आली...
या वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसनजी मुश्रिफ साहेब , आ. बाबाजानी दुराणी साहेब राकाँपाचे प्रदेश कोषाध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव गर्जे साहेब, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. सूरजदादा चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे निरिक्षक मा. श्री. नजीब जी. मुल्ला साहेब, प्रदेश अध्यक्ष मा. श्री. इद्रिस नायकवडी व प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री. वसिमजी बुर्हाण यांच्या उपस्थित नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
0 Comments