Header Ads Widget


आई म्हाळसादेवी मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा..


प्रतिनिधी/ शहादा

       शहारातील म्हाळसा नगरात स्थापित असलेले म्हाळसा देवी मंदिराची स्थापना 13 ऑक्टोंबर 2019 ला कोजागिरी पौर्णिमेला करण्यात आली होती . कोजागिरी पौर्णिमा हा मंदिराचा वर्धापन दिवस असल्याने व त्यास जोडून नवरात्र हा उत्सव साजरा केला जातो . या काळात मंदिरात विविध उपक्रम केले जात असतात.
      मातेचा वर्धापन दिनी याग केला गेला . याग ह भ प हर्षल कुलकर्णी व त्यांचे पाच सहकारी बांधव यांच्या सुश्राव्य वाणीतून करण्यात आला . याग जवळपास चार तास सुरू होता. याग होत असताना देवी स्तुती, गणपती अथर्व शीर्ष घेण्यात आले अधून मधून भक्ती गीत घेण्यात येत होते त्यामुळे भाविक मंत्र मुग्धपणे आनंद घेत होते व भजनात तल्लीन होऊन नाचत होते . भक्ति संगीत  व मंत्रोपचराने  संपूर्ण परिसर हा भक्तिमय व प्रसन्न वातावरणात नाहून निघाला. नंतर दुसऱ्या दिवशी प्राचार्य एस पी पाटील यांच्या परिवाराकडून महाप्रसाद देण्यात आला व नैवद्य आरती करण्यात येऊन वर्धापन दिन व नवरात्र उत्सवाची सांगता करण्यात आल्याची माहिती मंदिर सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांनी दिली.

    याग व हवंन साठी प्रा गणेश सोनवणे, प्रा एस पी पाटील, ईश्वर सोनार, प्रेम कासोदेकर, देवेंद्र भावसार, मनोज जयस्वाल, कौस्तुभ मोरे हे सहपरिवार बसले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर सेवा समिती चे अध्यक्षा डॉ संगीता कलाल, सचिव विद्या सोनवणे उपाध्यक्ष निलेश सोनार, कार्याध्यक्ष वकिल पाटील , खजिनदार स्वप्नील पाटील, सहसचिव सोनाली जयस्वाल, सदस्य डॉ विजय कलाल, गणेश सोनवणे, संजय प्रकाशकर, डॉ लक्ष्मण सोनार,  अजय सोनवणे, प्रा गणेश सोनवणे, निलेश देवरे, प्रा बी डी मराठे, प्रा विलास जावरे, गिरीश जावरे, भटू जव्हेरी, दीपिका शहा यांनी  मेहनत घेतली.

  यावर्षी नवरात्र उत्सवात सहपरिवार आरतीस बोलविण्याची नवीन  संकल्पना अध्यक्षा डॉ संगीता कलाल यांनी केल्याने आरतीस आलेल्या मान्यवरांनी त्यांचे व सेवा समितीचे कौतुक केले

Post a Comment

0 Comments

|