Header Ads Widget


५०० कोटींचे ड्रग्ज जप्त ;नंदुरबारचे सुपुत्र अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चैतन्य मंडलीक यांची धडाकेबाज कामगिरी....

नंदुरबार /प्रतिनिधी- अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखा व महसुल गुप्तचर संचालनालय यांच्या पथकाने केलेल्या संयुक्त कारवाईतून छत्रपती संभाजीनगर येथून सुमारे ५०० कोटी रुपयांचा अंमलीपदार्थांचा असलेला ड्रग्जसाठा जप्त केल्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई नंदुरबारचे सुपुत्र व सध्या अहमदाबाद गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चैतन्य मंडलीक यांनी पथकासह केली आहे.

गुजरात राज्यातील अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चैतन्य मंडलीक यांना महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जसाठा असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिस
उपायुक्त चैतन्य मंडलीक व महसुल गुप्तचर संचालनालय यांच्या पथकाने संभाजीनगर शहरात सलग २५ दिवस तळ ठोकून ऑपरेशन राबविले. संभाजीनगर येथील कारखान्यातून ड्रग्जसाठा मुंबई, मध्यप्रदेश व गुजरात राज्यात पाठविला जात असल्याची खात्री झाली. या पथकाने शहरातील कांचनवाडी वसाहतीस निवासस्थान पैठण एमआयडीसीसह दोन कारखान्यांवर धाडी टाकल्या. या कारखान्यात २५० कोटींचे अंमलीपदार्थ अन् २३ हजार लिटर ड्रग्ज बनविणारी रसायने महसुल गुप्तचर संचालनालयाने कारवाईत हस्तगत केली. तसेच तिघांना अटक केली असून मुळ गुजरातच्या सुत्रधाराने स्वतःच्या मानेवर मारुन घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे एमआयडीसी परिसरात सलग २५ दिवस वेशांतर करीत पाळत ठेवून एकाला ताब्यात घेतले. तसेच गुजरातमधील एका मोबाईल नंबरवरुन संशयीताची झाडाझडती घेत कारखान्यावर धाडी टाकल्या. या कारवाईत अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त चैतन्य मंडलीक यांच्यासह पथकाने केलेल्या कारवाईत ५०० कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. संभाजीनगरातील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केल्याची कामगिरी गुजरातच्या अहमदाबाद पोलिस गुन्हे शाखेचे उपायुक्त चैतन्य मंडलीक यांनी केली आहे. उपायुक्त चैतन्य मंडलीक हे नंदुरबारचे सुपुत्र असून सेवानिवृत्त पाटबंधारे अभियंता रविंद्र मंडलीक यांचा मुलगा आहे.

Post a Comment

0 Comments

|