शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत असल्याने म्हाळसा मंदिर परिसरात साफ सफाई सोबत रंगरंगोटी कामाला सुरुवात झाली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिंदू सणावळीला सुरुवात झाली असून हिंदू धर्मीय लोकांसाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा सण व उत्सव म्हणजे नवरात्र उत्सव भाद्रपद महिन्यात पित्तरांची पूजा पाठ होऊन नवीन उत्साहात भर टाकणारा हा सण असतो . या उत्सवात कुलदेवतेचा मान सन्मान करण्याची प्रथा आहे . वर्षातून एकदा कुलदेवतेचा सन्मान केला जातो . बारा बलुतेदारांची कुलदेवता असलेली म्हाळसा माता ही डोंगरागाव रोडवरील म्हाळसा नगरात बसविण्यात आली आहे . मातेचे नंदुरबार जिल्ह्यातील हे एकमेव मंदिर असून परिसरातील बर्याच समाज बांधवांची ही कुलदेवता आहे
परिसरातील व आजूबाजूचा खेडेगावतील कुलादेवता असणारी म्हाळसा मातेची पाच वर्षांपूर्वी स्थापना झाल्याने सर्व सेवेकरी वृंदामध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे. शारदीय नवरात्र उत्सवसाचे औचित्य साधून म्हाळसा मंदिर सेवा समितीने मंदिर व परिसराची साफ सफाई केली असून मंदिर रंगकाम भाविकांचा सहकार्याने होत आहे . मंदिर रंगकामासाठी भाविकांचा मदतीचा ओघ सुरू आहे सेवा समितीने दिलेल्या आवाहनास प्रतिसाद सुरू आहे .
मंदिर सेवा समिती तर्फे शारदीय नवरात्र उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्ल्याची माहिती मंदिराचे संस्थापक अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांनी दिली. नवरात्र उत्सव सुरू झाल्यावर कुटुंब व मान्यवरांचा हस्ते आरती होणार असून . (मंगळवारी )17 तारखेस महा आरती चे नियोजन करण्यात आले असून रोज दुपारी ते पाच या वेळेत पाठ वाचन होणार आहे . रात्रीस दहा वाजेपर्यंत गरब्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिर अध्यक्ष डॉ संगीता कलाल, सचिव विद्या सोनवणे,उपाध्यक्ष निलेश सोनार, कार्याध्यक्ष वकील पाटील, खजिनदार स्वपिल पाटील , सहसचिव सोनाली जयस्वाल, सदस्य गणेश सोनवणे, भटू जव्हेरी, डॉ लक्ष्मण सोनार, डॉ विजय कलाल, दीपिका शहा, प्रा गणेश सोनवणे, विलास जावरे, गिरीश जावरे, प्रा बी डी मराठे, निलेश देवरे, अजय सोनवणे, ऋषिकेश प्रकाशकर सहकार्य करत आहेत.
0 Comments