Header Ads Widget


नंदुरबार येथील 7 वर्षीय नारायणी मराठे या चिमुकलिने बुद्धिबळ स्पर्धे देशात प्रथम येण्याचा मान पटकावला..


नंदुरबार/ प्रतिनिधी


नंदुरबार  येथील सात वर्षीय नारायणी मराठी चिमुकलिने बुद्धिबळ स्पर्धे देशात प्रथम येण्याचा मान पटकावला, नंदुरबारच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. नंदुरबार शहरातील नारायणी उमेश मराठे या सात वर्षीय चिमुकलीने कोलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत देशात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे, या 36 व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करीत होती, नारायणी ही नंदुरबार शहरातील उमेश नारायण मराठे यांची सुकन्या असून, तिला लहानपणा पासूनच बुद्धिबळ खेळण्याची आवड आहे, तिला मिळालेल्या या यशाने आज नंदूरबार जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या निवासस्थानी खासदारांच्या हस्ते तिला मिळालेल्या 50 हजार रुपयांचा धनादेश व मिळालेले ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी तिचे आई-वडील नातेवाईक उपस्थित होते, नारायणीच्या या यशात आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असून, तिला बुद्धिबळ स्पर्धेत यश प्राप्त करण्यासाठी तिच्या शिक्षकांनी देखील मोलाचा असं मार्गदर्शन केलं, नारायणीला जागतिक पातळीवर बुद्धिबळ स्पर्धेत सहभाग नोंदणीत यावा याकरिता, मुख्यमंत्री यांच्याकडे राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचं खासदर डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी सांगितले, नारायणी मराठी या सात वर्षीय बालिकेने ही देशासाठी दैदिप्यमान कामगिरी करून ती देशाचं नाव आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत निर्माण करेल असा विश्वास तिच्या आईने माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments

|