Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्यातील गणेश मंडळांचा उद्या गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार..!!

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची विशेष उपस्थिती

नंदुरबार प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी मागील वर्षी एका महत्वाच्या अभियानाची सुरुवात केली होती, विविध सण / उत्सव दरम्यान विशेषत: गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करणे. सण / उत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून मागील वर्षी गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करणे, गणेश स्थापना काळात उत्कृष्ट देखावा सादर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी CCTV कॅमरे बसविणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ इत्यादी निकष पूर्ण करणारे गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसासाठी गणेश मंडळांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते. 

त्याअनुषंगाने मागील वर्षी जिल्ह्यातील 12 पोलीस ठाणे हद्दीतील दिलेल्या निकषांची पूर्तता करणारे नोंदणीकृत व इतर गणेश मंडळांना दिनांक 14/09/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार शहरातील राजपुत लॉन्स येथे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री. विजयकुमार गावित यांचे हस्ते व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचे उपस्थितीत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच गणेशोत्सव काळात पोलीस दलास सहकार्य करणाऱ्या जिल्ह्यातील गणेश मंडळांचा देखील यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. 

दिनांक 19 सप्टेंबर 2023 ते दिनांक 28 सप्टेंबर 2023 दरम्यान गणेशोत्सव सण साजरा करण्यात येणार आहे.  यावर्षी देखील नंदुरबार जिल्ह्याची परंपरा कायम ठेवत गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवून गणेशोत्सव व इतर धार्मिक सण साजरे करावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी केले होते. पोलीस दलाच्या आवाहनास जिल्ह्यातील डी.जे. / डॉल्बी धारकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने डी.जे. व डॉल्बी सिस्टिम वाहनासह जिल्हा पोलीस दलाकडे स्वेच्छेने जमा करुन वाहनांच्या चाव्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचेकडे सुपुर्त करणार आहेत. त्यावेळी डी.जे. व डॉल्बी धारकांचाही पुष्पगुच्छ देवून सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत व इतर गणेश मंडळांनी दिनांक 14/09/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार शहरातील राजपुत लॉन्स येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील यांनी केले आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, यावर्षी साजरे होणारे गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करणे, गणेश स्थापना काळात उत्कृष्ट देखावा सादर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी CCTV कॅमरे बसविणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे तसेच पोलीस प्रशासनास सहकार्य करणारे गणेश मंडळ इत्यादी निकष पूर्ण करणारे गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात येणार आहे. 

(पी.आर.पाटील) पोलीस अधीक्षक, नंदुरबार

Post a Comment

0 Comments

|