Header Ads Widget


नंदुरबार जिल्ह्यात बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी नाव नोंदणी करण्याचे युवकमित्र संस्थेचे आवाहन


0 ते 18 वर्ष वयोगटातील एक पालक असलेली( एका पालकाचा मृत्यू,घटस्फोट,पालक विभक्तीकरण,अविवाहित मातृत्व,गंभीर आजार इ.कारणामुळे कुटुंब विघटित झालेली बालके),आई वडील  नसलेली, कुष्ठरोग, HIV, कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त पालकांची मुले, जन्मठेेपेची शिक्षा भोगत असलेल्या  कैद्यांची मुले,भिक्षा मागणारी बालके,40% पेक्षा अधिक  अपंगत्व असलेली,अंध, दिव्यांग बालके,तीव्र कुपोषित,दुर्धर आजार असलेली,दोन्ही पालक दीव्यांग असलेली बालके तसेच कोविड सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही / एक पालक गमावलेली बालके तसेच अनाथ, निराश्रित,दुर्धर  व काळजी संरक्षणाची गरज असलेल्या o ते 18 वर्ष वयोगटातील मुलं मुलींना पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व संस्थेतील वातावरण ऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे यासाठी शासनाने *क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना*  लागू केली आहे. या योजने अंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ,निराधार बालकांचे संगोपन करणाऱ्या कुटुंबीयास बालक 18 वर्षाचे पूर्ण होईपर्यंत प्रतीमाह 2250/- रू. दरमहा परिपोषण अनुदान देण्यात येते.

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी 'युवकमित्र परिवार नंदुरबार ' संस्थेमार्फत अनाथ ,निराधार,एकल पालक असलेल्या,दुर्धर आजाराने ग्रस्त काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचा शोध घेण्यात येत आहे. *तरी नंदुरबार जिल्ह्यातील o ते 18 वर्ष वयोगटातील एक पालक असलेली( एका पालकाचा मृत्यू,घटस्फोट,पालक विभक्तीकरण,अविवाहित मातृत्व,गंभीर आजार इ.कारणामुळे कुटुंब विघटित झालेली बालके),आई वडील  नसलेली, कुष्ठरोग, HIV, कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त पालकांची मुले, जन्मठेेपेची शिक्षा भोगत असलेल्या  कैद्यांची मुले,भिक्षा मागणारी बालके,40% पेक्षा अधिक  अपंगत्व असलेली,अंध, दिव्यांग बालके,तीव्र कुपोषित,दुर्धर आजार असलेली,दोन्ही पालक दीव्यांग असलेली बालके तसेच कोविड सारख्या रोगाच्या प्रादुर्भावाने दोन्ही / एक पालक गमावलेली बालके तसेच अनाथ, निराश्रित,दुर्धर  व काळजी संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे पालक/ शिक्षक बांधव/ ग्रामसेवक/ सरपंच/गावातील समाजसेवक यांनी अशा बालकांची माहिती घेऊन खालील लिंकंमध्ये दि.11 सप्टेंबर वार सोमवार रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत माहिती सादर करावी* असे आवाहन युवकमित्र परिवार नंदुरबार मार्फत करण्यात येत आहे.

क्रुपया खालील लिंकवर माहिती भरून सहकार्य करावे ही विनंती.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScbxAF19zyqaFPCNzH-w6nmRmMty8rY-YvIwpJ8JHCYvsN-Kg/viewform

Post a Comment

0 Comments

|