Header Ads Widget


शहीद टिपू सुलतान फलकावरुन होणारे राजकारण थांबविण्याची मागणी


फलकास संरक्षण मिळावे; सदा जनसेवा फाऊंडेशनचे प्रशासनाला निवेदन


नंदुरबार शहरातील बागवान गल्लीत नगरपरिषदेच्या ठरावानुसार लावलेल्या शहीद टिपू सुलतान यांच्या अधिकृत फलकावरुन राजकारण करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम होवू लागले आहे. म्हणुन शहीद टिपू सुलतान यांच्या फलकाला संरक्षण मिळावे, अशी मागणी सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान व सर्व समाजबांधवांनी केली आहे.


याबाबत जिल्हाधिकारी मनिषा खत्री, पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, नंदुरबार येथील बागवान गल्लीतील मुख्य चौकास शहीद टिपू सुलतान नामकरण करण्याबाबतचा ठराव क्र.७४ दि.१९/०८/२०१४ रोजी नगरपरिषदेच्या सभेत पारीत करुन शहीद टिपू सुलतान यांच्या नावाचे फलक नामकरण करण्यात आले. परंतु गेल्या काही वर्षांपासून या फलकाच्या मुद्यावरुन राजकारण करीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रकार आजतागायत होत आहे. शहरातील सर्व जाती धर्माचे लोक शांतता व सामाजिक सलोख्याने गुण्यागोविंदा राहत असतांना आता पुन्हा शहीद टिपू सुलतान या अधिकृत फलकाचा मुद्दा चव्हाट्यावर आणून राजकारण करीत धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम होवु लागले आहे. 

भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी सदर फलक काढण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली असून तसे बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाली आहे. बागवान गल्ली, पारशी चक्की जवळील शहीद टिपू सुलतान यांचे फलक अधिकृत असून शहीद टिपु सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी, म्हैसूर राज्याचे शूर शासक, उर्दू पत्रिकेचे जनक, महान कवी अशी महापुरुषांमध्ये ओळखला जाणारा त्यांचा इतिहास आहे. परंतू काही जणांकडून शहीद टिपू सुलतान फलकाबाबत चुकीचा गैरसमज पसरविला जात आहे. हे फलक पालिकेच्या ठरावानुसार अधिकृत परवानगीने लावलेले आहे. म्हणून नंदुरबार येथील बागवान गल्ली चौकातील शहीद टिपू सुलतान यांच्या नामकरण फलकास संरक्षण मिळावे, अशी मागणी सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एजाज बागवान, माजी नगरसेवक आरिफ शेख कमर, सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष शाकीर बागवान, माहिती अधिकार महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील अरशद हुसेन, काकर समाजाचे अध्यक्ष आरिफ काकर, सामाजिक कार्यकर्ता सलमान शेख, जुबेर शेख, वसीम काझी आदींनी निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments

|