प्रतिनिधी/शहादा
शहादा कलाल समाजातर्फे दहावी बारावी पास असलेल्या गुणवंत विद्यार्थीचा व विविध क्षेत्रातील यश संपादन केलेले विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच म्हाळसा मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी कलाल समाज अध्यक्ष प्रा गणेश सोनवणे हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक सदाशिव सा कलाल, हरीसा कलाल, डॉ विजय कलाल हे उपस्थित होते . पुढे बोलताना प्रा सोनवणे म्हणाले की आपला शहादा तालुक्यातील कलाल समाज हा छोटासा आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती हा त्याचा त्याचा क्षेत्रात आपले अस्तित्व टिकवून आहे . समाजातील व्यक्तींची व समाजाची दखल घेतली जाते .
आपण देखील सर्व विद्यार्थ्यांनी हा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व आपल्या सोबत समाजाची प्रगती कशी होईल यासाठीं प्रयत्न करावेत अश्या शुभेच्छा दिल्यात . सुरुवातीला कलाल समाजाचे आराध्य दैवत सहस्त्र बाहू व सरस्वती मातेचा प्रतिमेचे पूजन मान्यवरांचा हस्ते करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .
मोक्ष भगवान कलाल , गीतेश विलास जावरे, मोहिनी गोपाळ काळांकर, मल्हार विजय कलाल, कौस्तुभ गणेश सोनवणे या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. डॉ विजय कलाल यांनी देखील गुणवंत विद्यार्थी व समाजाला मार्गदर्शन केले . यावेळी मोहिदा लोणखेड व परिसरातील समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा विलास जावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसंत कलाल, चेतन कलाल, सागर कलाल, आशिष कलाल, कृष्णा कलाल, संजय कलाल, बाळू कलाल, विशाल कलाल, राकेश कलाल यांनी परिश्रम घेतले .
0 Comments