Header Ads Widget


आई-वडील जर भक्ती मार्गाला असतील तर त्याची मूल बुद्धीवान व चतुर असतात. संस्कार चांगली पिढी घडविण्याचे कार्य करते व संस्कार हे घरातूनच आपल्या वडील धारी मंडळींकडून मिळत असतात असे प्रतिपादन आचार्य अनिल शर्मा यांनी केले.


प्रतिनिधी/ शहादा
         डोंगरगाव रोडवरील अन्नपूर्णा लॉन येथे भक्ती परिवार व स्वामी समर्थ केंद्र मार्फत शिव महापुरण कथेचे आयोजन केले आहे . कथेचे निरूपण कंचनखेडी म प्र येथिल आचार्य अनिल शर्मा यांचा सुश्राव्य वाणीतून करण्यात येत आहे . पुढे बोलताना महाराज म्हणाले दान धर्म उदार मनाने करा. ज्याचे पूर्वज पुण्यवान असतात तेच दान धर्म करू शकतात. व हे सर्वांचा भाग्यात देखील नसते वागताना बोलताना आपली वागणूक आपले संस्कार दाखविते . खोट बोलणारा व्यक्ती डोळ्यात डोळे टाकून बोलू शकत नाही . त्याची नजर ही चोरटी असते . परमेश्वर सर्वत्र आहे हे मान्य केलं तर बेईमानी बंद होईल जो बेईमानी करतो त्याला दोष  लागतो .
    शिव महत्व सांगताना शर्माजी पुढे म्हणाले की भस्म आंघोळ केल्याने पुण्यलोक प्राप्त होते भस्म तीन प्रकारचे आहेत एक लोकाग्निजाणिक म्हणजे पूजा करताना मानवाने धूप तथा अगरबत्तीचा माध्यमातून मिळवलेले भस्म दुसरे भस्म म्हणजे वेदागनिजाणिक जे पूजा करताना वेदांचा माध्यमातून मिळते तर सर्वांत पवित्र भस्म म्हणजे शिवागनिजाणिक भस्म जे पूजा करताना शिवाचे नाव घेऊन तयार होते . ईश्वराचा नावात मोठीं शक्ती आहे त्याचा जपण्याने काही मागायची गरज नसते. संसार करताना ईश्वर प्रार्थनेसाठी वेळ देणारे लोक ही पुण्यवान असतात. पण कर्म टाळून ईश्वर भक्ती केली तर ते ईश्वरास प्राप्त होत नाही 
    रोज सकाळी सात ते दहाया वेळात अकराशे आठ रुद्रणवर महाभिषेक केला जातो व रोज वेगवेगळ्या देवांचा मंत्रोपचारानी  पूजन होते त्यावेळी मुख्य यजमान पाच तर इतर यजमान शंभर असतात कथा रोज दोन ते पाच यावेळेत होत असून शनिवारी कथेची सांगता महाप्रसाद व रुद्र वाटप करून  होणार असल्याचे आयोजकामार्फत सांगण्यात आले

Post a Comment

0 Comments

|