Header Ads Widget


श्री. शिव महापुराण कथेचे आयोजन शहादा येथील अन्नपूर्णा लॉन मध्ये करण्यात आले आहे.


प्रतिनिधी/ शहादा

      येथील अन्नपूर्णा लॉन मध्ये श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

      हिंदू धर्मीय लोकांसाठी अधिक मास हा पवित्र महिना मानला जातो त्याचेच औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व भक्ती परिवार सेवा संस्थान शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शिव महापुराण कथा , लिंगारचन पूजा रुद्राक्ष महोत्सव सोहळ्याचे  आयोजन करण्यात आले आहे 
      कथा व लिंगारचन सोहळा मध्य प्रदेश येथील कंचनखेडी  रतलाम गावातील प पु आचार्य अनिल शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून संपन्न होणार आहे . कथेची वेळ दुपारी 2 ते 5  राहणार असून सकाळी सात ते दहा या वेळात लिंगारचन सोहळा आयोजित करण्यात आला आहे . 

      कार्यक्रम 23 जुलै ते 29 जुलै दरम्यान असून 22 जुलै शनिवार रोजी दुपारी 4 वाजता कलश यात्रा राहाणार असून रविवार 30 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसाद वाटप होणार आहे . तरी भावकांनी अन्नपूर्णा लॉन येथे होणाऱ्या भक्तीमय सोहळयास उपस्थित राहुन कथेचा आनंद घेण्याचे आवाहन आयोजका मार्फत करण्यात आले आहे

Post a Comment

0 Comments

|