Header Ads Widget


आ. आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या देण्यात आल्या..

 
अक्कलकुवा/प्रतिनिधी


    विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या देण्यात आल्या. आज या दोन्ही घंटागाडींचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला
       अक्कलकुवा शहरातील घरा घरातुन घन कचरा नेऊन त्या घन कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी ग्रामपंचायतीला दोन घंटा गाड्या दिल्या. या घंटा गाडीचा लोकार्पण सोहळा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी आमदार आमश्या  पाडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापती नानसिंग वळवी, गटविकास अधिकारी लालू पावरा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती टेडग्या वसावे, तालुका शेतकरी सह संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, व्हा चेअरमन अशोक पाडवी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी युवराज पवार, अक्कलकुवा शहराच्या लोकनियुक्त सरपंच उषाबाई बोरा आदी उपस्थित होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून दिलेल्या घंटागाडींचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते पुजन करुन घंटागाडींचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक लक्ष्मण वाडीले, शेतकरी सह.संघाचे व्हाईस चेअरमन नवरतन टाक, रविंद्र चौधरी, रोहित चौधरी, रावेंद्रसिंह चंदेल, कुणाल जैन, रोहित सोनार, सुफियान मक्राणी, तुकाराम वळवी, राजेंद्र, वसावे, कुवरसिंग वसावे, अश्विन तडवी, डॉ.उदय आगीवाल, डॉ.सुहास सुर्यवंशी, डॉ.अरुण पाटील,भटू बोरा, मोहसीन मक्राणी,गुलाम कादर बलोच आदीं सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी नितीन जावरे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments

|