Header Ads Widget


साक्रीत बुद्ध पौर्णिमा निमित्त भव्य भीम गितांचा कार्यक्रम संपन्न...


 प्रतिनिधी /अकील शहा 

                  जगाला शांती मानवताचा संदेश देणारे तथागत महाकारुणिक गौतम  बुद्ध यांच्या वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंती निमित्त साक्री शहरातील बुद्ध विहार नगर येथे बुद्ध विहार नगर बाबा ग्रुपच्या वतीने रात्री छ. संभाजीनगर येथील प्रसिद्ध गायक संतोष मोरे यांचा भिम विचारांचा प्रवाह प्रस्तुत बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी मान्यवर म्हणून साक्री नगर पंचायत चे नगरसेवक सुमित नागरे, नगरसेवक पंकज मराठे, चोपड्याचे गट विकास अधिकारी भरत कोसोदे, माजी सभापती प्रेरणा कैलास वाघ, जय मल्हार सेनेचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ मारनर , भाडणेचे लोकनियुक्त  सरपंच अजय सोनवणे, आरपीआयचे साक्री तालुका अध्यक्ष  कमलाकर मोहिते, वंचित बहुजन आघाडीचे साक्री तालुका अध्यक्ष  शरद वाघ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी बुद्धांच्या मूर्तीस मेणबत्ती प्रज्वलित करून व बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील व बुद्ध पूजा ग्रहण करून उपस्थित जनसमुदायास खीर दान करून बुद्ध -भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या तीन तासाच्या कार्यक्रमात महिला भगिनींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम अतिशय उत्साहात व जल्लोषात पार पडला. सदर कार्यक्रमाची प्रास्ताविक राजेंद्र वाघ यांनी केले व प्रबोधन व सूत्रसंचालन प्रा. डॉ.कैलास वाघ यांनी केले. यावेळी  भटेश्वर ब्राह्मणे, दादूभाऊ वाघ, किशोरनाना वाघ, पवन ब्राह्मणे, विकी पिंपळे, मच्छिंद्र वाघ, गोरख बोराळे, कृष्णा वाघ, दादाभाऊ सूर्यवंशी, नानाजी मोरे , दिलीप पानपाटील, अनिल मगर, आर.डी साळवे, जे.डी वाघ,माधव थोरात, शरद मोरे, दीपक वाघ,नाना वाघ शेवाळी, डॉ. लोखंडे, जितू पिंपळे श्रीराम खरे, रोहित बोराळे,उमेश वाघ, रोहित जवराज, गोरख वाघ आकाश वाघ, सुनील मोरे, कमलेश मोहिते, सुभाष मोरे,संजय मोरे विजय बेडसे, अरबाज सय्यद, सागर मोरे यांसह बुद्ध विहार नगर बाबा ग्रुप साक्रीचे कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Monday, May 19. | 12:36:42 AM