Header Ads Widget


साक्री तालुक्याचे भूमिपुत्र राहुल नांद्रे यांना नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल "आदर्श ग्रामसेवक" पुरस्कार प्रदान...


प्रतिनिधी/अकिल शहा
   
     नाशिक जिल्हा परिषद( ग्रामपंचायत विभाग) यांच्यावतीने शालीमार नाशिक येथे "आदर्श ग्रामसेवक "पुरस्कार सोहळा दिनांक ८मे २०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता महाकवी कालिदास मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता, या पुरस्कार समारंभात साक्री तालुक्यातील छडवेल (पं)  व तसेच शेवाळी(दा) येथील कै.जयवंतराव सदाशिव साळुंके यांचे नातू व प्रतापराव जयवंतराव साळुंखे यांचे भाचे राहुल रमेश नांद्रे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत किकवारी खु. ता. सटाणा जिल्हा नाशिक यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
  "आदर्श ग्रामसेवक "पुरस्कार वितरण कार्यक्रम मा.श्रीमती.आशिमा मित्तल(भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व तसेच प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
 साक्री तालुक्याचे भूमिपुत्र राहुल नांद्रे यांना "आदर्श ग्रामसेवक "पुरस्कार प्रदान करून सन्मानित केल्याबद्दल  साक्री तालुका व परिसरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव करून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments

|