नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपरिषद हद्दीत असलेले चंद्रमा बिअरबार बाबतचे निवेदन विवेक मनु बिऱ्हाडे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रहीवासी यांनी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना दिले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नवापूर नगरपरिषद हद्दीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शेजारी अनेक वर्षांपासून चंद्रमा बिअरबार सुरु आहे. सदरचे बिअरबार हे अधिकृत आहे किंवा अनधिकृत याबाबत कृपया चौकशी करून कारवाई करण्यात यावी. तसेच सदरचे बिअरबार हे रहीवासी भागात आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने या बिअर बारच्या समोरच देवस्थान तसेच शेजारील बाजुस शाळा आहे.या
शाळेत अनेक लहान मोठे बालक हे शिक्षणासाठी जात असलेल्या शाळेचा मार्ग देखील तोच आहे.यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर देखील परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे.तसेच अनेक शालेय विद्यार्थी देखील या बिअरबारमध्ये बसून दारु पितात हे देखील दृष्टीस पडले आहे. सायंकाळच्या वेळी या बिअरबारमध्ये गावातील तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक
येथील अनेक नागरिक, दिवसभर कष्ट करुन राबणारा मजुर हे दारु पितात व अनेकवेळा या
बिअरबारमध्ये भांडण, मारामाऱ्या तसेच अर्वाच्च भाषेचा / शिवीगाळचा अनुभव देखील आलेला असल्याने, रहिवासी भागात राहणाऱ्या महिलांना तसेच सुशिक्षित वर्गास अडचणीचे होत आहे. या चंद्रमा बिअरबारची चौकशी करुन ते अधिकृत किंवा अनधिकृत आहे याची चौकशी व्हावी व सदर व्यवसाय हा रहिवासी भागात, देवस्थानसमोर तसेच शाळेजवळ भागात चालविणे कितपत योग्य आहे, याचा कृपया आपल्या स्तरावरुन विचार तथा चौकशी होऊन 15 दिवसाच्या आत कार्यवाही व्हावी याबाबत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील रहीवासी विवेक मनु बिऱ्हाडे, लताबाई अहिरे, शुभांगी अहिरे, सुमनबाई तांबोळी, रसोजबाई तांबोळी, सुशिला अहिरे, पारीबाई अहिरे, संजय चौधरी, आशा चौधरी, सुरेखा भोई, सीमा भोई, अतुल पाटील, सतिष भोई, कल्पेश पाटील आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.
- Home-icon
- महाराष्ट्र
- आपला विभाग
- _कोकण
- __मुंबई विभाग
- __ठाणे
- __पालघर
- __रायगड
- __रत्नागिरी
- __सिंधुदुर्ग
- _खानदेश
- __नाशिक
- __धुळे
- __नंदुरबार
- __जळगाव
- __अहमदनगर
- _पश्चिम महाराष्ट्र
- __पुणे
- __सातारा
- __सांगली
- __सोलापूर
- __कोल्हापूर
- _नागपूर विदर्भ
- __नागपूर
- __वर्धा
- __भंडारा
- __गोंदिया
- __चंद्रपूर
- __गडचिरोली
- _मराठवाडा
- __औरंगाबाद
- __बीड
- __जालना
- __उस्मानाबाद
- __लातूर
- __नांदेड
- __हिंगोली
- __परभणी
- _अमरावती विदर्भ
- __अकोला
- __अमरावती
- __बुलढाणा
- __यवतमाळ
- __वाशिम
- सामाजिक
- राजनियतीक
- आरोग्य
- मनोरंजन
- क्रीडा
- इतर आवश्यक
- नौकरी विषयक
- मराठी मुसलमान
0 Comments