Header Ads Widget


नंदुरबार ! सामाजिक अशांतता परसविणाऱ्या दंगेखोरांवर पोलीसांची कठोर कारवाई !

नंदुरबार शहरातील अहिल्यादेवी विहीर, जुना कुंभारवाडा परिसरात राहणारा एका युवकाचे दिनांक 04/04/2023 रोजी रात्री सव्वा अकरा ते साडे अकरा  वाजताचे सुमारास लक्कडकोट जुना बैलबाजार अलीसाहब मोहल्ला परिसरातील काही तरूणांसोबत वैयक्तीक कारणावरून वाद झाला होता.  


महाराष्ट्र व्यायामशाळा परिसरात वाद सुरु असल्याची माहिती नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच नियंत्रण कक्षात प्राप्त झाल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनेमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होवू शकते म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार यांना तातडीने घटनास्थळी रवाना होवून कारवाई करणेबाबत निर्देश दिले. तसेच अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार शहरातील इतर अधिकारी अंमलदार देखील तातडीने घटनास्थळावर रवाना झाले. घटनास्थळी पोलीस अधिकारी अंमलदार पोहचल्यावर तेथे जमलेल्या 100 ते 150 जणांच्या आक्रमक जमावास त्यांनी शांततेचे आवाहन करून त्या परिसरातून निघून जाण्यास सांगितले. त्यावरून जमावाने पोलीसांच्या दिशेने दगडविटा काचेच्या बाटल्या फेकण्यास सुरूवात केली. जमावाने फेकलेल्या दगडविटा काचेच्या बाटल्यांमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक श्री. सागर आहेर पोलीस अंमलदार स्वप्नील पगारे हे जखमी झाले. जखमी झालेल्या अधिकारी अंमलदार यांच्यापैकी स्वप्नील पगारे यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान घटनास्थळावर हजर असलेले नंदुरबार जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक श्री.निलेश तांबे यांनी जमाव पांगविण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून जमाव पांगविला. नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देवून संबंधीतांना सूचना दिल्या. घटनास्थळावर हजर असलेल्या विविध वृत्तपत्रांच्या / इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या प्रतिनिधींनी सदर परिस्थिती हाताळण्यास मदत केली. दंगल करून पळून जाणाऱ्यांपैकी एकुण-28 दंगेखोरांना ताब्यात घेण्यात पोलीसांना यश मिळाले. पकडण्यात आलेले संशयित आरोपी त्यांच्या इतर साथीदारांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आज दिनांक 05/04/2023 रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्य यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी अपर पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्री. निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार श्री. सचिन हिरे तसेच इतर अधिकारी नंदुरबार शहरातील शांतता समितीचे सदस्य हजर होते. शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी आपले मते मांडून घडलेल्या घटनेचा निषेध केला.

काही समाजकंटकांकडून घडविण्यात आलेल्या या जातीय घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार शहरात रुटमार्च घेण्यात आला. पोलीस दलाकडून घेण्यात आलेल्या रुटमार्चमुळे सामान्य नागरिकात विश्वास निर्माण झाला. घेण्यात आलेल्या रूटमार्च करीता 09 अधिकारी,  80 अंमलदार 10 होमगार्ड हजर होते.

Post a Comment

0 Comments

|