Header Ads Widget


साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी केतन साळुंके यांची बिनविरोध निवड...

प्रतिनिधी/अकिल शहा

साक्री: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी(दा.) ग्रामपंचायतीचे उपसरपंच श्री अरुण नेरकर यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर केतन अरुण साळुंके यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे उपसरपंच पदी निवड करण्यात आली अशी माहिती ग्रामविकास अधिकारी  सोनवणे यांनी दिली.
   गावाच्या सरपंचा श्रीमती. चित्राताई प्रदीप नांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी एम.जी.सोनवणे यांनी काम पाहिले याप्रसंगी केतन अरुण साळुंके यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
 शेवाळी(दा) ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच श्रीमती. चित्राताई प्रदीप नांद्रे, मच्छिंद्र गायकवाड(ग्रा.पं.सदस्य),
पंढरीनाथ साळुंके   (ग्रा.पं.सदस्य),
कविता पगारे(ग्रा.पं. सदस्या) मंगलाबाई भदाणे  (ग्रा.पं.सदस्या) सुरेखाबाई साळुंखे(ग्रा.पं.सदस्या)अर्चना साळुंखे(ग्रा.पं.सदस्या),
अरुण दादा नेरकर (ग्रा.पं.सदस्य) ,पार्वताबाई पवार(ग्रा.पं.सदस्या) ,दादा बागुल(ग्रा.पं.सदस्य) असे सरपंचासह अकरा सदस्य  उपस्थित होते.
   सर्वप्रथम अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ. चित्राताई प्रदीप नांद्रे यांनी उपस्थित सदस्यांचे स्वागत करून निवडणुकीला प्रारंभ केला . एकमेव अर्ज आलेला असल्याने बिनविरोध उपसरपंच पदी केतन साळुंके यांची घोषणा करण्यात आली यावेळी पॅनल प्रमुख तथा गटनेता माजी उपसरपंच प्रदीप नांद्रे यांच्यासह गावातील आजी-माजी पदाधिकारी, नेतेमंडळी, उत्साही तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बिनविरोध उपसरपंच पदी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद उत्सव साजरा केला.
 बिनविरोध निवडणूक झाल्यानंतर उपस्थित शेवाळी(दा.) येथील ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री.दीपक साळुंके व सर्व सदस्य, ग्राम सुधार मंडळाचे  चेअरमन साहेबराव साळुंके आणि सचिव सुरेश  साळुंके व सर्व सदस्य, माध्यमिक विद्यालय तामसवाडी चे मुख्याध्यापक निंबाजी साळुंके, पंचायत समिती माजी उपसभापती श्री.नितीन साळुंके ,माजी उपसरपंच दगाजी साळुंके, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच माधवराव नांद्रे,शेवाळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच प्रदीप नांद्रे व  ग्रामस्थांच्या वतीने केतन साळुंके यांचे अभिनंदन केले तसेच शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments

|