नाशिक : अतिक अहमदचा जवळचा गुड्डू मुस्लिम याला यूपी पोलिसांनी अटक केली आहे. गुड्डू मुस्लिम याला महाराष्ट्रातील नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. गुड्डू मुस्लिम उमेश पाल हत्याकांडातील आरोपी आहे.
उमेश पाल हत्याकांडात गुड्डू मुस्लिम याने बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यूपी पोलीस अनेक दिवसांपासून गुड्डू मुस्लिमाचा शोध घेत होते. त्यासाठी गुड्डू मुस्लिमाचे लोकेशन ट्रेस केले जात होते. आता त्याचे लोकेशन ट्रेस करताना एसटीएफने त्याला नाशिक येथून अटक केली आहे.
उमेश पाल खून प्रकरणातील एकूण पाच आरोपी फरार होते. यामध्ये सर्वात मोठे नाव असद हे अतिक अहमद यांचा मुलगा असून त्याला यूपी पोलिसांच्या एसटीएफने गुरुवारी झाशी येथे एनकाउंटर केले. असदसोबतच आणखी एक शूटर गुलामही चकमकीत मारला गेला.
0 Comments