Header Ads Widget


साक्री येथील जन ग्रामीण पत्रकार संघातर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

साक्री प्रतिनिधी : अकिल शहा 
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याची संयुक्त जयंती निमित्ताने साक्री येथील क्लासिक फोटो स्टुडिओ येथे आज जन ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा  फुले व भारताचे संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते फुलहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी  मान्यवर म्हणून दैनिक सकाळ वृत्तपत्राचे साक्री तालुका प्रतिनिधी जगदीश शिंदे सर, प्रा.एल.जी. पाटील सर, डी एम पान पाटील सर, तसेच जन ग्रामीण पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब जी.टी. मोहिते, विद्यानंद पाटील, शरद चव्हाण त्याचबरोबर जन ग्रामीण पत्रकार संघाचे साक्री तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ, उपाध्यक्ष अकिल शहा, साक्री शहराध्यक्ष  जितेंद्र जगदाळे, उपाध्यक्ष संगपाल मोरे, सचिन सोनवणे,प्रवीण पाटील आदी जन ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Today is Thursday, April 10. | 2:31:16 PM