Header Ads Widget


धुळे एलसीबी ने केली गुटख्याची तस्करी उघड; कारवाईत ट्रक सह 12 लाख 18 हजार 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त....

प्रतिनिधी/अकिल शहा 
साक्री: गुजरात राज्यातील सुरत येथून मालेगाव कडे प्लास्टिक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठ्या आड होणारी गुटखा तस्करी रोखण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. साक्री तालुक्यातील दहिवेल शिवारात गुन्हे शाखेने ट्रक्स 12 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात ट्रक चालकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा सुरत येथून साक्री- धुळे मार्गे मालेगाव येथे ट्रक मधून नेण्यात येत असल्याची गुप्त माहिती दिनांक 26 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली त्यांनी तात्काळ पथकाला ट्रकचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशय ट्रक(MH-41/G-7165) चा शोध सुरू केला ट्रक दहिवेल कडून साक्री कडे जात असल्याचे दिसल्याने पथकाने ट्रक थांबविला त्यावरील चालकाने त्याचे नाव शेख असलम शेख उस्मान (वय43)रा. न्यू आझाद नगर ,गल्ली नंबर 5 मालेगाव चे सांगितले, ट्रक मधील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिली त्यामुळे पथकाने ट्रक सह त्यास ताब्यात घेतले व साक्री पोलीस ठाण्यात आणले ट्रकची तपासणी केली असता त्यात 98 हजार 400 रुपयांचा विमल सुगंधित पान मसाला व तंबाखूचा साठा मिळून आला त्यासह 10 लाखांचा ट्रक, पाच हजारांचा मोबाईल व एक लाख पंधरा हजारांचा प्लास्टिक कचरा कपड्यांचे गट्टे असा एकूण बारा लाख 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुटखा सुफियान(पूर्ण नाव माहित नाही)रा. मालेगांव याने मालेगाव शहरात विक्री करण्याच्या उद्देशाने चालक शेख असलम शेख उस्मान यांच्या ट्रक मध्ये लोड केला होता या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ यांनी साक्री पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध भांदवी कलम 328,272,273,188,34सह अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 कलम 26(2)(iv),27(d),27(3)(e),30(2)(a),3(1)(zz)(i)व 3(1)(zz)(v) चे उल्लंघन कलम 59(i) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,पोसई बाळासाहेब सूर्यवंशी,असई संजय पाटील,हेकाँ संतोष हिरे, सतीष पवार,पोना पंकज खैरमोडे,पोकाँ महेंद्र सपकाळ,पोना कलीम पटेल यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

|