नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा): अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने, राज्य शासनाच्या समन्वयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु केली आहे. या योजनेत जिल्ह्यात 1 लाख 12 हजार शेतकरी लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे.
या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबियांना 2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण 6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे. नुकतेच देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंच्या तेराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एकूण 1 लाख 30 हजार 366 लाभार्थीची यादी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात नंदुरबार 27 हजार 115, नवापूर 27 हजार 810, शहादा 31 हजार 731, अक्राणी 12 हजार 264, अक्कलकुवा 16 हजार 880 तर तळोदा 14 हजार 566 असे आहेत.
आजअखेर नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 419 शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केली असून यापैकी जिल्ह्यातील 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासीपूर्ण केली आहे. यात नंदुरबार 18 हजार 269, नवापूर 19 हजार 779,शहादा 22 हजार 843,अक्राणी 8 हजार 308,अक्कलकुवा 12 हजार 825, तसेच तळोदा तालुक्यातील 9 हजार 664 असे 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासी पूर्ण केली असून जिल्ह्यात ई-केवासी पूर्ण करण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. या योजनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यास मदत झाली असून ऐन खरीप हंगामात या रक्कमेचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.
पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई- केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवासी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले असून, लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर ओटीपी पद्धतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करु शकतील. तसेच आता पीएम किंसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वत:ची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे अधिक सहज आणि सोपी करण्यात आली आहे.,
तरी, सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे तसेच ज्या लाभार्थीची पीएम किसान पोर्टलवरील माहिती चुकीची असल्यामुळे लाभाची रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा लाभार्थीनी योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी आपले आधारकार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (7/12 इत्यादी) नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषीसेवक तसेच नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये यांच्याशी संपर्क साधून माहिती अद्यावत करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
दृष्टिक्षेपात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी
✅ किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एकूण 1 लाख 30 हजार 366 लाभार्थी
✅ नंदुरबार 27 हजार 115, नवापूर 27 हजार 810, शहादा 31 हजार 731, अक्राणी 12 हजार 264, अक्कलकुवा 16 हजार 880 तर तळोदा 14 हजार 566
✅ 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासीपूर्ण केले आहे.
✅ नंदुरबार 18 हजार 269, नवापूर 19 हजार 779,शहादा 22 हजार 843,अक्राणी 8 हजार 308,अक्कलकुवा 12 हजार 825, तसेच तळोदा तालुक्यातील 9 हजार 664 असे 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासी पूर्ण केली.
✅ केवासी पूर्ण करण्याचे प्रमाण 82 टक्के आहे.
✅ योजनेसाठी https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावर ओटीपी पद्धतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करु शकतील.
0 Comments