परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील विविध पक्षांतील पदाधिकारी, नगरसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यात प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय महासचिव जलील पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन भगवानराव जोशी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गवळणबाई नागमोडे, मानवतचे माजी पंचायत समिती अध्यक्ष शिवाजीराव अक्कडकर, मानवतचे माजी पंचायत समिती सभापती आनंदराव पठारे, माजी पंचायत समिती सभापती अनिल कदम, पाथरीचे माजी उपसभापती डॉ.बाळासाहेब धोक्षे तसेच पंचायत समिती सदस्य दिगंबर बुधवत, नवनाथ हातीआंबीरे, तुकाराम कऱ्हाळे, उत्तमराव सावधर आणि अन्य पंचायत समिती सदस्यांचा समावेश होता.
याशिवाय पाथरी, पूर्णा, मानवत, सेलू, पालम येथील नगरसेवक पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य अशा एकूण ४६५ लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी मंत्री अर्जुन खोतकर, वाशीमच्या खासदार भावनाताई गवळी, भाजप माजी खासदार संजय काकडे, युवा नेते सईद खान तसेच शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे आणि परभणी जिल्ह्यातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Arjun Khotkar Bhavana Gawali Sanjay Kakade
0 Comments