प्रतिनिधी/अकील शहा
रमजान महिन्यांमध्ये अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते या पार्टीमधून सामाजिक सलोखा राखला जातो ,सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे त्यानिमित्ताने शेवाळी गावातील रहेमानिया मस्जिद मध्ये सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक संदेश देण्यात आला.
शेवाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, दिवाळी, ईद-ए-मिलाद असे सण मोठ्या उत्साहात सर्वांच्या सहभागातून साजरे केले जातात या गावात एकता आणि बंधुता राखून सगळेच कार्यक्रम चे आयोजन मोठ्या उत्साहात साजरे केले जाते आणि विशेष म्हणजे सर्वजण एकमेकांच्या कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होतात.
दोन वर्षानंतर कोरोनावरील निर्बंध उठल्यामुळे इफ्तार पार्टीचे शेवाळी गावात आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाज बांधवांशी चर्चा व मार्गदर्शन करताना जुन्या आठवणींना उजाळा देत गावातील सर्व जाती धर्मातील लोक आधीपासूनच एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची जणू या गावाची परंपराच आहे, माझे बालपण या गावात गेले आहे मी आजही गावातील वरिष्ठ सर्व जाती धर्मातील लोकांना विसरलो नाही आहे, मी जरी आज मुंबईत राहत असलो तरी आज ही गावातल्या सर्व जाती धर्मातील समाजाच्या लोकांशी माझे घनिष्ठ संबंध आहेत, मुंबईत माझे जास्त करून मुस्लिम समाजातील व्यक्ती मित्र आहेत व ते नेहमी माझ्या संपर्कात असतात, मी आपल्या गावाच्या विकासासाठी सर्व जाती धर्मातील लोकांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे असे त्यांनी इफ्तार पार्टीमध्ये आपल्या भावना व्यक्त करीत प्रतिपादन केले तसेच त्यांनी विशेषतः मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती या विषयावर सच्चर समितीचा अहवाल उदाहरण देत यासंबंधी माहिती देऊन मुस्लिम तरुण तरुणींना शिक्षण घेण्यासाठी विनंती करीत मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले, मुस्लिम समाजाच्या तरुणांच्या हातांमध्ये देवाने कला दिली असून आज प्रत्येक क्षेत्रात विशेषता ऑटो इंजिनिअरिंग क्षेत्रात मुस्लिम बांधव अग्रेसर आहेत अशावेळी त्यांनी प्रॅक्टिकलला ही भर देता थेरी वर ही भर देवून आपला व समाजाचा विकास करावा असे मुख्य मार्गदर्शन केले.
शेवाळी गावात प्राध्यापक प्रकाश सोनवणे यांच्या मदतीने विविध विकास कामे होत असून त्यात प्रामुख्याने मुस्लिम समाज बांधवांसाठी कब्रस्तान साठी विशेष मेहनत घेऊन पाठपुरावा करून निधी मंजूर केल्याबद्दल गावातील सर्व मुस्लिम बांधवांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सर्व मुस्लिम बांधव, माजी पंचायत समिती उपसभापती नितीन साळुंके, साक्री तालुका काँग्रेस कमिटी चे कार्याध्यक्ष दीपक साळुंखे, माजी सरपंच दगाजी साळुंखे, माजी उपसरपंच माधवराव नांद्रे, तंटामुक्ती शांतता कमिटीचे नामदेवराव साळुंखे, माध्यमिक विद्यालय, तामसवाडी चे मुख्याध्यापक निंबाजी साळुंखे, माजी सैनिक चंद्रकांत साळुंखे,किशोर भदाने आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या तर्फे मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आले.
0 Comments