Header Ads Widget


जळगाव शहर पुन्हा हादरलं, ३० वर्षीय युवकांचे धारदार चाकूने निर्घृण हत्या


जळगाव : १० वाजेच्या सुमारास जळगाव शहराला हादरून टाकणारी मोठी घटना घडली, शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर तीस वर्षीय युवकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आला.

मिळालेल्या माहिती नुसार शहरातील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सोपान गोविंदा हटकर, वय ३०, रा. हरिविठठल नगर या तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजता घडली.खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरुणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.


दरम्यान अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे घटनास्थळी पोहचले त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून नेमकी काय घटना घडली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Post a Comment

0 Comments

|