Header Ads Widget


अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध दाखल याचिकेची सुनावणी घेत,औरंगाबाद खंडपीठाने नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिले आदेश...

      
अक्कलकुवा /प्रतिनिधी 

अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारातील गुन्ह्या संदर्भात काय प्रगती झाली तसेच भ्रष्टाचार झालेल्या कालावधीतील लेखापरीक्षण पूर्ण करण्यासाठी येत्या 31 मार्चपर्यंत शपथपत्र सादर करावे असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दाखल याचिकेची सुनावणी घेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक यांना आदेश दिले आहेत

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत 2016 ते  2021 या कालावधीत विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये झालेल्या विकास कामांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचे चौकशी अंतिम समोर आले होते त्यानंतर या भ्रष्टाचारात सामील असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर या कारवाईला थंडबस्त्यात गुंडाळण्यात आले आहे शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी व पदावर असलेल्या विद्यमान सरपंच यांना पायउतार करावे या संदर्भात औरंगाबाद खंडपीठात भूषण कीर्तीकुमार पाडवी यांनी याचिका दाखल केली आहे या याचिकेची सुनावणी 16 मार्च 2023 रोजी घेण्यात येऊन खंडपीठाने 10 ऑगस्ट 2021 रोजी  अक्कलकुवा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्या संदर्भात आज पर्यंत काय प्रगती झाली झाले यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांना माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ग्रामपंचायत भ्रष्टाचार झालेल्या 2016 ते 2019 दरम्यान च्या काळातील विविध शासकीय योजना साठी खर्ची झालेल्या निधीचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात नेमकी काय कार्यवाही केली तसेच सदर लेखापरीक्षण  येत्या 31 मार्चपर्यंत करण्यासाठी शपथपत्र सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहेत याची का करते भूषण कीर्ती कुमार पाडवी यांच्यातर्फे एडवोकेट ज्ञानेश्वर बागुल काम पाहत आहेत.
   
सन 2016 ते 2021 या कालावधीत अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रात झालेल्या विविध विकास कामांच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीनंतर लेखापरीक्षण करण्याच्या आदल्या दिवशीच ग्रामपंचायतीचे दप्तर जाळण्याच्या प्रकार घडतो विशेषतः चोरासाठी केवळ रद्दी असलेली कागदपत्र कशासाठी चोरून नेईन याबाबत अज्ञात चोरावर गुन्हा नोंदविण्यात आला असून या प्रकाराबाबतही शाशंकता व्यक्त करण्यात  आल्याचे एडवोकेट ज्ञानेश्वर बागुल यांनी न्यायालयासमोर मांडल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments

|