Header Ads Widget


MSEB चे कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात.

 

Aurangabad Bulletin

औरंगाबाद, दि. ०३/०२/२०२३.
आरोपी लोकसेवक वय 32 वर्षे, पद-तंत्रज्ञ, एम.एस.ई.बी. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद (वर्ग-3) यांनी तक्रारदार यांच्याकडुन रुपये. 40000/- लाचेची रक्कम मागणी केल्याने, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबादच्या जाळ्यात.
यातील तक्रारदार यांचे इंडस्ट्रियल मीटरचे कमर्शियल मीटर मध्ये बदल करुन कमर्शियल मिटर करुन देण्यासाठी व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आ.लो.से. यांनी पंच साक्षीदारासमक्ष 60000/- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 40000/- रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केले.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, पोलीस उप अधिक्षक, श्री. मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिता इटुबोने यांनी केली आहे. त्यांना सदर कारवाई कामी पोअं. राजेंद्र जोशी, दिगांबर पाठक, शिरीष वाघ, अशोक नागरगोजे, चालक देवसिंग ठाकुर, चांगदेव बागुल यांनी मदत केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments

|