Header Ads Widget


०३ आरोपीतास अटक, २५ मोटार सायकल जप्त, २० गुन्ह्यांची उघड.

 

कोल्हापूर : फिर्यादी हे राहत असलेल्या बंगल्यासमोर, तीनबत्तीचौक, इचलकरंजी येथे पार्क केलेली मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादीचे संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने चोरुन नेलेबाबत यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करणेत आला होता.
दिनांक २१/०२/२०२३ रोजी गुन्हेशोध पथकाचे अंमलदार हे मोटर सायकल चोरीचे गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत असताना नदीवेस जॅकवेल येथील रोडवर तीन इसम लाल रंगाचे फॅशन प्लस मोटर सायकलसह संशयास्पदरित्या मिळून आले. सदर इसमांना ताबेत घेवून चौकशी केली असता त्यांचे कब्ज्यात वरील गुन्हयातील चोरीची मोटर सायकल मिळून आलेने ती जप्त केली. सदर आरोपींकडे कौशल्याने तपास केला असता त्यांनी विविध ठिकाणाहुन मोटर सायकली चोरी केलेची कबूली दिलेने त्यांचेकडून तपासात एकुण २५ मोटर सायकली हस्तगत करणेत आलेल्या आहेत.

यातील एका आरोपितवर यापूर्वी शिवाजीनगर पोलीस ठाणेस ०२ मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपींकडे अधिक तपास सुरु असून त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे.

कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार – पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे – पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उप निरीक्षक मनोज पाटील, पो.अं. उदय पाटील,सागर चौगले, सुनिल बाईत,गजानन बरगाले, विजय माळवदे, सतिश कुंभार, पवन गुरव,अरविंद माने, प्रविण कांबळे शिवाजीनगर पो. ठाणे यांनी कारवाई केली..

Post a Comment

0 Comments

|