सातारा. दि. २५/०२/२०२३.
अजिंक्यतारा साखर कारखान्याला ऊसतोड करून वाहतूकसाठी टोळी पुरवण्यापोटी ७ लाख रूपये ऍडव्हान्स देऊनही टोळी न देता आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुकादमास बुधवारी बोरगाव पोलिसांनी जळगावात अटक केली.
याबाबतची अधिक माहिती अशी कि यातील फसवणूक झालेले तक्रारदार यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२२-२३ च्या गळीत हंगामात ऊस वाहतूक करण्याचा करार केला होता. त्यासाठी त्यांना ऊसतोड करणारी टोळी पाहिजे होती. त्यासाठी त्यांनी आरोपी यांच्यासोबत करारापोटी ठरलेली ७ लाख रूपयेची रक्कम श्रीमंत चव्हाण यांनी वेळोवेळी आरोपी यांना देऊनही मजूर न पुरवता त्यांची फसवणूक केली होती. याबाबत फिर्यादी यांनी दि. २५ जानेवारी २३ रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.याची दखल घेऊन मुकादमाचा तपास करण्याचे आदेश बोरगाव पोलीस ठाण्याचे स. पो. नि रविंद्र तेलतुंबडे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. तपासादरम्यान टोळी मुकादमाची गोपनीय माहिती काढून आरोपी यास कसबा पिंप्री, जळगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली आहे. सदरची कारवाई तेलतुंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष कॉन्स्टेबल राहुल भोये यांनी केली आहे.
0 Comments