Header Ads Widget


मा.क.पा.तर्फे नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांना निवेदन..


मा.क.पा. तर्फे नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांना आज २३ फेब्रुवारी २०२३ रोजी विविध समस्यांवर निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असे कि ग्रामीण रुग्णालय शहादा येथे होणारी नोकर भरतीमध्ये स्थानिक बेरोजगारांचा विचार करून त्यांनाही रोजगार उपलब्ध करण्यात यावे.


म. ग्रामीण रुग्णालय इमारत मोहीदे त.श.येथील गावठाण हदहीत असून सदर जागा पूर्वी स्थानिक भूमिहीन लोक कसून उदर निर्वाह करित होते. परंतु सदर जमीन शासनाने ताब्यात घेतली आणि सदर लोकांचा उदर निर्वाह साधन हिरावून घेण्यांत आले तरी आता होणाऱ्या नोकर भरतीत स्थानिकांना त्यांचा शैक्षणिक पात्रतेनुसार सामावून घेणेस विनंती करण्यात आली आहे.

निवेदन देताना कॉ. सुनिल भाऊ गायकवाड , आयु.सतीलाल महिरे, कॉ.राजाराम ठाकरे ,कॉ.संतोष गायकवाड आयु. सुरेश सामुद्रे ,आयु.सिद्धार्थ गायकवाड, ग्रा.प. सदस्यां:- अरुणाबाई नथा महिरे ,आयु:श्रीराम महिरे आयु: सुधिर ठाकरे , सुनंदाबाई गायकवाड, सारिका महिरे ,शोभाबाई गायकवाड, सुनिता महिरे, संगीता सामुद्रे ,योगेश माहिरे..

Post a Comment

0 Comments

Today is Tuesday, April 15. | 3:43:10 AM