लायन्स क्लब नंदुरबार व समाज भूषण राजेंद्र भाऊ माळी सेवा मंच तर्फे माळी वाड्यात महाआरोग्य शिबिर संपन्न..
February 23, 2023
श्री नागेश्वर महादेव मंदिर शिव प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिना निमित्त व महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त संगीतमय शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते आदरणीय भैय्यासाहेब चंद्रकांत जी रघुवंशी यांचा हस्ते आरती करण्यात आली व तसेच लायन्स क्लब नंदुरबार, निम्स हॉस्पिटल व समाज भूषण राजेंद्र भाऊ माळी सेवा मंच तसेच कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने माळीवाड्यात श्री नागेश्वर महादेव मंदिरात मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले.
या शिबिरात मोफत ब्लड शुगर, बी पी, इ सी जी, दंत तपासणी, नेत्र तपासणी करण्यात आली व त्यातून मोतीबिंदू शस्त्रक्रियेस पात्र १३ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया कांता लक्ष्मी नेत्ररुग्णालयात होणार आहे.या शिबिरात क्लब तर्फे मोफत औषधी वाटपही करण्यात आले.
या शिबिरात निम्स हॉस्पिटल प्रमुख डॉ शिरीष शिंदे, डॉ अनिकेत चौधरी डॉ तन्मय राकेजा यांनी तपासणी केली तर करूणा झाल्टे, नितीन कदम,किसन पाडवी ,रवींद्र तमायेचकर यांनी सहकार्य केले.
तसेच कांता लक्ष्मी नेत्र रुग्णालयातील डॉ शाम सूर्यवंशी,डॉ फुलसिंग पाडवी, धनंजय जाधव यांनी नेत्र तपासणी करून मार्गदर्शन केले. तसेच डॉ धीरज महाजन, डॉअंकिता महाजन-पवार यांनी दंत तपासणी केली.
या शिबिराचे संयोजन प्रोजेक्ट चेयरमन डॉ शिरीष शिंदे , अध्यक्ष सतीश चौधरी, सचिव उद्धव तांबोळी, ट्रेझरर शंकर रंगलानी, यानी केले तर शिबीर यशस्वीतेसाठी श्रीराम दाऊतखाने, राजेंद्र माहेश्वरी, नितीन जैन, श्रीराम मोडक, समीर शाह, जगदिशभाई सोनी,यांचेसह शिव सावता भक्त परिवार ,श्री नागेश्वर महादेव सेवा समितीचे प्रमुख नगरसेवक जगन्नाथ माळी विजय माळी देवाजी माळी धनराज माळी मोहन माळी निंबा माळी चुडामन माळी विजय बोडरे जी.बी.लोखंडे काशीनाथ बोढरे सुनील माळी महेंद्र माळी अविनाश माळी कुणाल माळी बापू महाजन,अभिमन्यू माळी आनंद बोडरे मनोज माळी यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले
0 Comments