Header Ads Widget


वाहन चोरीचे गुन्हे उघड.

 


कोल्हापूर, दि. १५/०२/२०२३.
फिर्यादी यांचे पॉवरलुमचा कारखान्यामध्ये प्रवेश करुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने कारखान्यातील २०,५००/- रुपये किमतींचे सुताचे तीन बॉक्स चोरुन नेले बाबत यातील फिर्यादी यांनी दिले फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी दिपक कांबळे, नागेश शिंदे व त्यांचे साथीदारांनीच केला असलेची गोपनीय बातमी प्राप्त झाली.म्हणून सदर आरोपींचा यापूर्वी दाखल असले गुन्हयातून ताबा घेवून त्यांना वरील गुन्हयाचे कामी अटक करुन, त्यांचेकडे सुत बॉक्स चोरीसह अन्य चोरीच्या गुन्हयांबाबत कौशल्याने तपास केला असता आरोपी व त्यांचे साथीदारांनी कोल्हापूर जिल्हयासह सांगली, सातारा व सोलापूर जिल्हयातून मोटर सायकली व चार चाकी वाहने चोरी केली असलेली कबूली दिली.त्याप्रमाणे तपासात आरोपींकडून त्यांनी चोरी केलेली वाहने हस्तगत करणेत आलेली आहेत. यामध्ये इस्लामपूर येथून चोरी केलेली बोलेरो पिक गाडी आरोपी नागेश शिंदे याने त्याचे साथीदारासह स्क्रॅप केलेचे निष्पन्न झाले आहे.
अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील असून आरोपी क्र.१ दिपक कांबळे याचेवर शिवाजीनगर, इचलकरंजी व शहापूर पोलीस ठाणेत चोरी, जबरी चोरी, दिवसा व रात्री घरफोडी सारखे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपी क्र.२ याचेवर इचलकरंजी व शिवाजीनगर पोलीस ठाणेत चोरी, घरफोडी व मारहाणीचे ०३ गुन्हे दाखल आहेत.आरोपी क्र.३ याचेवर शिवाजीनगर, इचलकरंजी, शहापूर, सातारा पोलीस ठाणेत चोरी, जबरी चोरी व दिवसा घरफोडीचे २० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी क्र.४ हा इचलकरंजी पोलीस ठाणेकडील मर्डरसह मोक्का गुन्हयातून जामीनावर मुक्त झालेला आहे. यातील आरोपींकडे अधिक तपास सुरु असून त्यांचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येणेची शक्यता आहे.
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे – पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वेंजणे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पो.अं.सागर चौगले, सुनिल बाईत,गजानन बरगाले, विजय माळवदे, सतिश कुंभार, पवन गुरव,अरविंद माने, प्रविण कांबळे शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी कारवाई केली.

Post a Comment

0 Comments

|