Header Ads Widget


राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका..



उस्मानाबाद ! Usamanabad/LivenationNews 
प्रतिनिधी /बिलाल कुरेशी

शरदचंद्र महाविद्यालय शिराढोण यांचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर मौजे पिंप्री येथे 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत संपन्न होत आहे. शिबिराचे उद्घाटन पिंप्री चे ग्रामसेवक श्री पटणे डी एस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना पटणे सर म्हणाले की अशा शिबिरातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडले जाते आणि राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. साजेद चाऊस हे होते. शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आलटे एस एम, श्री शिंदे एस जी, डॉ. तांबोळी फारूक, श्री प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते .राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना महत्त्वाचे आहे स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील माणसाचे जीवन समजून घेतले पाहिजे. खेड्यापाड्यात राहणाऱ्या गोरगरीब माणसासाठी आपण काम केले पाहिजे या शिबिरामधून आपल्यामध्ये नक्कीच अशी भावना निर्माण होईल व पुढे आयुष्यामध्ये आपण राष्ट्रासाठी काही काम कराल असे विचार यानिमित्ताने डॉ. फारूक तांबोळी यांनी मांडले. प्रा. डॉ. आल्टे एस एम मनाले की राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम ,राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव, सामाजिक बांधिलकी यासाठी युवक तत्पर व सक्षम व्हावा यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. प्रास्ताविक करत असताना कार्यक्रम अधिकारी डॉ. सय्यद अमर यांनी सात दिवसीय शिबिराची रूपरेखा मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरमाळे एम बी व आभार डॉ. शेख ए आय यांनी मानले. या उद्घाटन समारंभ प्रसंगी सहकार्यक्रम अधिकारी प्रा. भिसे आर आर, नानासाहेब पाडे, व्यंकट पाडे, चव्हाण सर व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

|