Nashik Police : नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे.
Nashik Police : नाशिक (Nashik) ग्रामीण पोलिसांकडून अवैध धंद्यांच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून त्या पार्श्वभूमीवर कारवाईची मोहीम सुरु आहे. दिंडोरी तालुकयातील आशेवाडी परिसरात बेकादेशीर वाहतूक करणाऱ्या विदेशी मद्याचा सुमारे पावणे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीण पोलिस (Nashik Police) अधिक्षक शहाजी उमाप यांनी अवैध धंद्याविरोधात जोरदार कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासुन जिल्ह्यातील अनेक भागात धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून दररोज जिल्ह्यात कारवाया करण्यात येत आहेत. अवैध धंद्यांविरोधात नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सुरु केलेली कारवाई सध्या चांगलीच चर्चेची विषय ठरत आहे. त्यानुसार नाशिक ग्रामीण जिल्हयातील राज्य व राष्ट्रीय महामामार्गांवरील अवैधरित्या होणारी मद्याची वाहतुक विक्रीस प्रतिबंध होण्यासाठी पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी जिल्हयातील पोलीस ठाणेनिहाय कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत.
दरम्यान अवैध धंदयांवर कारवाई करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिंडोरी तालुक्यातील आशेवाडी परिसरात गस्त घालत असतांना विशेष माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीचे आधारे पथकाने दिंडोरी - पेठरोडवर आशेवाडी शिवारात एका आयशर वाहनावर छापा टाकला. सदर छाप्यात विशाल साळबा आंधळे यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातुन विदेशी मद्याचा सुमारे 04 लाख 69 हजार 720 रूपये किंमतीचा अवैध मद्यसाठा व आयशर वाहन असा एकुण 14 लाख 69 हजार 720 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. यातील संशयित हा विनापरवाना बेकायदेशीररित्या मद्याची वाहतूक करतांना मिळून आला असून त्याच्याविरूध्द दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीसाठी संपर्क क्रमांक
दरम्यान पोलिस अधीक्षक शहाजी उमाप (Shahaji Umap) यांनी नाशिक जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार पोलिस ठाणेनिहाय निरीक्षकांची पथके व स्थानिक गुन्हे शाखांची पथके रात्रदिवस कार्यरत आहेत. अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे व पथकनिहाय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. यामुळे ग्रामीण भागात अवैध धंदेचालक, जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अवैध दारू विक्री, जुगार, अवैध वाळू, अंमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती देण्यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हेल्पलाईन क्रमांक सुरू आहे. कारवाईस टाळाटाळ केल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर देखिल कारवाई केली जाणार असून अवैध धंद्याबाबत ग्रामीण पोलिसांकडून नागरिकांसाठी 6262256363 हा टोल फ्री क्रमांक जारी करण्यात येऊन माहिती देणाऱ्याचे नावही गुपित ठेवले जाणार आहे.
0 Comments